Indian Football Team Dainik Gomantak
क्रीडा

SAFF Championship 2023: भारत-पाकिस्तान संघात महामुकाबला! केव्हा, कधी होणार सुरु होणार मॅच, जाणून घ्या सर्वकाही

India vs Pakistan: बुधवारी भारत आणि पाकिस्तान फुटबॉल संघात सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

SAFF Championship 2023, India vs Pakistan: भारतीय फुटबॉल संघाने तीन दिवसांपूर्वीच इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला होता. त्यानंतर आता लगेचच भारतीय संघ SAFF चॅम्पियनशीप २०२३ स्पर्धेतील मोहिम सुरू करणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून मैदानात उतरणार आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा समावेश अ गटात आहे. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील आपापला पहिला सामनाही असणार आहे. हा सामना बंगळुरूमधील श्री कांतिरावा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याबद्दल तपशील जाणून घेऊ.

SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी खेळवला जाणार आहे?

- SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २१ जून २०२३ रोजी म्हणजेच आज खेळवला जाणार आहे.

SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरू होणार आहे?

- SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.

SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे खेळवला जाणार आहे?

- SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्री कांतिरावा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर लाईव्ह पाहाता येणार आहे?

- SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहाता येणार आहे.

SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ऑनलाईन कसा पाहाता येईल?

- SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ऑनलाईन फॅनकोड ऍपवर आणि अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT