Sachin Tendulkar playing cricket on street in Kashmir X/sachin_rt
क्रीडा

Sachin Tendulkar: काश्मीरमधील बॅट फॅक्टरीच्या भेटीनंतर रस्त्यावर उतरत मास्टर-ब्लास्टरची फटकेबाजी, Video Viral

Sachin Tendulkar Video Viral: सचिन तेंडुलकर सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून तिथे त्याने गल्ली क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला, त्याचा व्हिडिओ त्यानेच शेअर केला आहे.

Pranali Kodre

Sachin Tendulkar playing cricket on street in Kashmir:

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहे. तो कुटुंबासह सहलीसाठी जम्मू-काश्मीरला गेला आहे. दरम्यान, त्याच्या या दौऱ्यादरम्यानचे काही व्हिडिओ आणि फोटोही त्याने शेअर केले आहेत. नुकताच त्याचा काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या सहलीदरम्यान सचिनने काश्मीरमधील प्रसिद्ध बॅट फॅक्टरी काश्मीर विलोला देखील भेट दिली. याबद्दल त्यानेच एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्याने यावेळी कॅप्शनमध्ये त्याच्या बहिणीने त्याला पहिली कॅश्मीर विलो बॅट दिली असल्याची आठवणही सांगितली होती.

इतकेच नाही, तर तो त्यानंतर काश्मीरमधील रस्त्यावर उतरून क्रिकेटही खेळला. याचा व्हिडिओही शेअर करताना त्याने लिहिले की 'क्रिकेट आणि काश्मीर: स्वर्गसुंदर सामना'.

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की सचिन रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या लोकांजवळ जातो आणि त्यांना विचारतो की 'आम्ही खेळू?' तो यावेळी गोलंदाज कोण आहे, असेही विचारताना दिसत आहे.

त्यानंतर तो बॅट हातात घेतो आणि काही शॉट्स खेळतो. त्यानंतर शेवटचा चेंडू आहे असं सांगत बॅट उलटी धरतो आणि सांगतो की यावर त्याला आउट करा. मात्र, उलट्या बॅटनेही सचिन शॉट खेळला. सचिनच्या या व्हिडिओला सध्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सचिनबरोबर त्याच्या या दौऱ्यात त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा आहे. सचिनने भारत आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या कमान अमन सेतूलाही या सहलीदरम्यान भेट दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT