Sachin Tendulkar: कोकण दौऱ्याच्या आठवणीना उजाळा देत मास्टर-ब्लास्टरची भारतीय किनारपट्टी पर्यटनासाठी बॅटिंग

Sachin Tendulkar: सचिनने त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कोकण दौऱ्याच्या आठवणींना उजाळा देत तेथील आदरातिथ्याचेही कौतुक केले आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarInstagram

'Explore Indian Islands', Sachin Tendulkar Shares Glimpse of his Sindhudurg tour to Celebrated 50th Birthday:

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन आता एक दशक उलटले आहे. तरी निवृत्तीनंतरही सचिन बऱ्याचदा चर्चेत असतो. कधी एखाद्या कार्यक्रमानिमित्त, कधी त्याच्या विविध ठिकाणाच्या भेटीनिमित्त, तर कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे.

सचिन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अनेकदा तो क्रिकेटबद्दलही पोस्ट करतो. पण सध्या तो चर्चेत आलाय, ते त्याच्या भारतीय किनारपट्ट्यांबद्दल आणि बेटांबद्दल केलेल्या पोस्टमुळे.

Sachin Tendulkar
IND vs AFG: भारताविरुद्ध T20 मालिकेसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा; 19 खेळाडूंना मिळाले स्थान

सचिन बऱ्याचदा कोकण, गोवा अशा किनारपट्टी लाभलेल्या भागांना भेट देताना दिसला आहे. त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्तही त्याने कोकण आणि गोवा दौरा केला होता. आता याचबद्दल त्याने पोस्ट करत म्हटले आहे की भारतीय बेटांचा आनंद घ्या.

त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'आम्ही माझा 50 वा वाढदिवस सिंधूदुर्गमध्ये करून आता २५० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या गावाने आम्हाला जे हवे होते ते सर्व दिले. सुंदर ठिकाणे होती आणि त्याचबरोबर अप्रतिम आदरातिथ्य आमच्यासाठी आठवणींचा खजिना ठेवू गेले.'

'भारताकडे सुंदर किनारपट्टी आणि मूळ बेटे आहेत. आपल्या 'अतिथी देवो भव' या तत्वज्ञानासह खूप गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत आणि कितीतरी आठवणी निर्माण होण्याची वाट पाहत आहेत.'

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar: '...त्यामुळे मी प्रभावित झालो', शतक करणाऱ्या केएल राहुलची सचिनने थोपटली पाठ

सचिनने या पोस्टमध्ये त्याचा सुमद्र किनारी फलंदाजी करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. तसेच त्याने किनारपट्ट्याचे फोटोही शेअर केले आहेत.

त्याची ही पोस्ट अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे, तसेच त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहे. दरम्यान, काही युजर्सने याचा संबंध सध्या भारत-मालदीव या दोन देशांमध्ये तयार झालेल्या राजकिय तणावाशीही जोडला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर मालदीवमधील काही राजकीय नेत्यांनी मालदीवशी स्पर्धा न करण्याच्या अर्थाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बीच पर्यटनावरून चर्चांना उधाण आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com