Sachin Tendulkar - KL Rahul X
क्रीडा

Sachin Tendulkar: '...त्यामुळे मी प्रभावित झालो', शतक करणाऱ्या केएल राहुलची सचिनने थोपटली पाठ

KL Rahul Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी केलेल्या केएल राहुलचे सचिन तेंडुलकरने कौतुक करताना त्याच्या कोणच्या गोष्टीने प्रभावित केले, याबद्दलही सांगितले आहे.

Pranali Kodre

Sachin Tendulkar reacted on KL Rahul Century during South Africa vs India Centurion Test:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर मंगळवारपासून (26 डिसेंबर) कसोटी मलिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात भारतचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली. याबद्दल त्याचे सध्या कौतुक होत असून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकनेही त्याला शाबासकीची थाप दिली आहे.

या सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी केली.

त्याच्याशिवाय या डावात भारताकडून कोणालाही 40 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर केएल राहुलने केलेल्या शतकाबद्दल सध्या त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लिहिले की, 'केएल राहुल शानदार खेळलास. त्याच्या स्पष्ट असलेल्या विचारांनी मला सर्वाधिक प्रभावित केले. त्याच्या पायांच्या हालचाली अचूक आणि खात्रीदायक होत्या, हे तेव्हाच होते, जेव्हा फलंदाज योग्य विचार करत असतो. कसोटीच्या दृष्टीने त्याचे हे शतक महत्त्वपूर्ण होते. काल ते ज्या स्थितीत होते, तिथून २४५ धावा झाल्याने भारतीय संघ खूश असेल.'

याबरोबरच दक्षिण आफ्रिकेतीन नवोदीत गोलंदाज नांद्रे बर्गर आणि गेराल्ड कोएत्झीचेही कोतुक सचिनने केले. त्याने लिहिले, 'नांद्रे बर्गर आणि गेराल्ड कोएत्झी हे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी फळीत समाविष्ट झालेले चांगले पर्याय आहेत. मला वाटते वातावरण पाहाता दक्षिण आफ्रिका त्यांच्या गोलंदाजी कामगिरीवर फारशी खूश नसेल.'

या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलच्या शतकाव्यतिरिक्त विराट कोहलीने 38 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 31 धावांची खेळी केली.

याशिवाय शार्दुल ठाकूरने 24 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने 17 धावा केल्या. याशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाखेर 66 षटकात 5 बाद 256 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गारने नाबाद 140 धावा केल्या आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Virat Kohli: विश्वविक्रम रचण्यापासून 'किंग' कोहली फक्त एक पाऊल दूर, 'क्रिकेटच्या देवा'ला मागे टाकण्याची संधी

Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल; हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती, रविंद्र जडेजाच्या बायकोलाही मंत्रीपद

Viral Video: ट्रेनमधून जाणाऱ्या महिलेनं मोठा दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर भिरकावला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT