Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणतो, 'दिल में भी तिरंगा, घर में भी तिरंगा' Video

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्याला येत्या 15 ऑगस्टला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून हर घर तिरंगा आणि अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी देखील आज आपल्या घरी राष्ट्रिय ध्वज (तिरंगा) फडकवला. यावेळी सचिन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करत सचिन यांनी 'दिल में भी तिरंगा, घर में भी तिरंगा' असे म्हणत घरात तिरंगा फडकवला. (Sachin Tendulkar hoisted indian flag at his house)

'हमेशा रहा मेरे दिल में तिरंगा, आज लहराएगा मेरे घर पे भी तिरंगा,' असे म्हणत सचिन तेंडुलकर यांनी आपल्या घरी तिरंगा फडकवला. 'दिल में तिरंगा, घर में तिरंगा, जय हिंद' असे सचिन आपल्या व्हिडिओ म्हणताना दिसत आहेत.

दरम्यान, देशात हर घर तिरंगा ही मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. देशातील कानाकोपऱ्यातील नागरिक, नेते, अभिनेते, खेळाडू, मंत्री, सरकारे मोठ्या उत्साहात या मोहिमेत आपला सहभाग नोंदवत आहेत. प्रत्येक भारतीय नागरिक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT