Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar 100th Century: मास्टर ब्लास्टरने शतकाची 10 वर्षे केली पूर्ण, पण...

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके… हा आकडा गाठण्याचे स्वप्न जगातील क्वचितच कोणत्या फलंदाजाने पाहिले असेल, परंतु सचिन तेंडुलकरच्या 100 व्या शतकाने ते पूर्ण केले. 2012 मध्ये या दिवशी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शतक झळकावले होते. आशिया कप 2012 मध्ये बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) सचिनने मीरपूरच्या मैदानावर हा इतिहास रचला होता. विशेष म्हणजे 100 शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. पुढील दोन दशकांत 100 शतके करणारा तो फलंदाज बनला होता. मीरपूरमध्ये सचिन तेंडुलकरने 147 चेंडूत 114 धावा केल्या होत्या. सचिनने शतकासाठी 138 चेंडूचा सामना केला होता. (Sachin Tendulkar completed 100th Century against Bangladesh in Asia Cup 2012)

दरम्यान, सचिनने शतकी खेळी करुन इतिहास रचला, परंतु हा सामना टीम इंडियाने गमावला होता. अनेक समीक्षकांनी यावेळी सचिनच्या संथ खेळीवरुन टीकाही केली होती. त्या सामन्यात भारताने 50 षटकात 289 धावा केल्या होत्या. परंतु बांगलादेशने शेवटच्या षटकात 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले होते.

वकार युनूसने सचिनच्या शतकावर टीका केली

भारतीय संघाने हा सामना हरल्यानंतर पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार वकार युनूसने सचिनविरोधात वक्तव्य केले होते. वकार युनूस (Waqar Younis) म्हणाला होता, ''अनेकांना ही गोष्ट आवडणार नाही पण सचिनच्या शतकामुळे टीम इंडिया (Team India) मॅच हरली. भारताने 300 हून अधिक धावा करायला हव्या होत्या, मिरपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक होती.''

सचिनचा विक्रम मोडणे खूप कठीण

सामना हरल्यानंतर सचिनवर टीकेची झोड उठली होती. परंतु जगानेही त्याच्या 100 शतकांना सलाम केला. सचिनचा हा विक्रम मोडणे खूप कठीण आहे. सचिननंतर पॉन्टिंगने 71 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. कोहलीनेही 70 शतके झळकावली असून सचिनचा हा विक्रम तो मोडू शकेल असं मानलं जात आहे. परंतु विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांपासून शतक झळकावता आलेले नाही, त्यामुळे आता या गोष्टीवर सगळ्यांनाच शंका येऊ लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT