Rituraj Gaikwad, MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad: 'माही भाई नेहमीच...', ऋतुराजने सांगितले करियरमध्ये धोनीची कशी झाली मदत

MS Dhoni: टी20 क्रिकेटमध्ये खेळताना धोनीची कशी मदत झाली, याबद्दल ऋतुराज गायकवाडने भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Ruturaj Gaikwad reveals how MS Dhoni helped him in T20 Cricket Career:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली. दरम्यान, त्याने त्याच्या यशासाठी एमएस धोनीला श्रेय दिले आहे.

ऋतुराज आणि धोनी गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून एकत्र खेळतात. तसेच ऋतुराजकडे चेन्नईचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जाते.

दरम्यान, धोनीच्या प्रभावाबद्दल ऋतुराज जीओ सिनेमाशी बोलताना म्हणाला, 'मी या क्रिकेट प्रकाराबद्दल बऱ्याच गोष्टी सीएसके संघात खेळताना शिकलो. माही भाई नेहमीच परिस्थिती आणि खेळ समजून घेण्यासाठी उत्सुक असतो.'

'माही भाई मेसेज पाठवायचा की सामन्याच्या परिस्थिती कशीही असली, तरी तुम्ही संघाच्या धावसंख्येकडे लक्ष द्या आणि संघाची गरज ओळखा. मानसिकरित्या टी२० क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळ जसा सुरू आहे, त्याच्या पुढे जाऊन विचार करावा लागतो आणि मी त्याला जास्त महत्त्व देतो. मी सामन्यापूर्वी रात्री कल्पना करतो की सामन्यात कोणकोणती परिस्थिती उद्भवू शकते आणि खेळपट्टी कशी असू शकते.'

तो पुढे म्हणाला, 'माही भाई नेहमीच यावर जोर देतो की आम्ही आमचे विचार जास्त भटकू देऊ नये, कारण टी20 क्रिकेटमध्ये सलामीवीराकडे जास्त वेळ असतो.'

दरम्यान, ऋतुराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत शानदार फॉर्ममध्ये असून त्याने 4 सामन्यात 71 च्या सरासरीने 213 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तो या मालिकेत सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

भारताने केला मालिकेवर कब्जा

दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अखेरचा सामना होण्यापूर्वीच भारताने मालिकेतील विजय निश्चित केला आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना 3 डिसेंबर 2023 रोजी बंगळुरूला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT