Rituraj Gaikwad, MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad on MS Dhoni: सलग 7 षटकार ठोकणारा ऋतुराज म्हणतोय, 'धोनीकडून शिकलोय की...'

ऋतुराज गायकवाडने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल आपले अनुभव सांगितले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Ruturaj Gaikwad on MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्येही त्याचे नाव घेतले जाते. भारताला आपल्या नेतृत्वाखाली 3 आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिलेल्या धोनीचे त्याच्या नेतृत्त्वाबद्दल नेहमीच कौतुक होत असते. आता त्याच्याबद्दल चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल संघातील संघसहकारी ऋतुराज गायकवाडनेही आपले अनुभव सांगितले आहेत.

गेले जवळपास 3 हंगामात ऋतुराज धोनीसह चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएल एकत्र खेळत आहे. त्यामुळे त्यांनी बराचवेळ एकत्र घालवला आहे. नुकतेच आता ऋतुराजने माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राबरोबर बोलताना धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्याचेही मान्य केले.

ऋतुराज म्हणाला, 'सर्व खेळाडू चांगले संघात मिसळून गेले आहेत. सामना पराभूत झाल्यानंतर सर्वजण 10-15 मिनिट शांत राहायचे. पण माही भाई प्रेझेंटेशनवरून आल्यानंतर आम्हाला सांगायचा की असं होतं, रिलॅक्स रहा.'

'हे सर्व ऐकल्यानंतर तुम्ही थो़डे रिलॅक्स राहाता. एमएस धोनीने मला जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने होत नसतात, तेव्हा तटस्थ राहण्यास शिकवले. आणि जरी तुम्ही विजयी झाले असाल, तरी तुम्ही तटस्थ राहणे महत्त्वाचे असते, हे देखील समजले.'

तसेच ऋतुराज पुढे म्हणाला, 'जिंका किंवा पराभूत व्हा, धोनी संघातील वातावरण बदलणार नाही, याची काळजी घेतो. नक्कीच पराभवानंतर निराशा असते, पण नकारात्मकता नसते. कोणीही कोणावर आरोप करत नाही. अनेकदा असे होते की जेव्हा तुम्ही सातत्याने पराभूत होता, तेव्हा संघात एक वेगळा ग्रुप तयार होते. पण चेन्नई सुपर किंग्स संघात असे होत नाही.'

ऋतुराज चेन्नई सुपर किंग्स संघातील महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने गेल्या दोन हंगामात चेन्नईकडून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला 2023 आयपीएलसाठी देखील चेन्नईने संघात कायम केले आहे.

ऋतुराजने ठोकले द्विशतक

विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राचा कर्णधार असलेल्या ऋतुराजने द्विशतकी खेळी केली. त्याने 159 चेंडूत 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 षटकार आणि 10 चौकार मारले. विशेष म्हणजे या खेळीदरम्यान त्याने 49 व्या षटकात एका नोबॉलवरील षटकारासह सलग 7 षटकार मारले आणि 42 धावा चोपल्या.

त्यामुळे तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 7 षटकार ठोकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT