Dhoni Pandya Video: बादशाहच्या रॅपवर धोनी-पांड्याचा ठेका; दोघांचा डान्स व्हायरल

पार्टीत कमी प्रमाणात सहभागी होणारा धोनी अलिकडेच हार्दिक पांड्यासोबत एका पार्टीत दिसला.
Dhoni Pandya Viral Video
Dhoni Pandya Viral VideoDainik Gomantak

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावत असतो. पार्टीत कमी प्रमाणात सहभागी होणारा धोनी अलिकडेच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत एका पार्टीत दिसला. या पर्टीत प्रसिद्ध रॅपर बादशाह देखील उपस्थित होता. यावेळी बादशाहच्या (Badshah) रॅपवर धोनी-पांड्या यांनी ठेका धरला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Dhoni Pandya Viral Video
Karnataka: मशिदीसारख्या दिसणाऱ्या कर्नाटकमधील 'त्या' बसस्थानकाचे अखेर रूपडं पालटले

इन्स्टंट बॉलिवूड नावाच्या Instagram पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत बादशाह काला चष्मा या गाण्याचा रॅप गाताना दिसत आहे. तर, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी त्या रॅपवर डान्स करताना दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनी माहीला पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट देखील केल्या जात आहेत. तर, काहीजण दोघांना ट्रोल देखील करत आहेत.

Dhoni Pandya Viral Video
Jayanti Chauhan & Bisleri: 7,000 कोटींची बिस्लेरी चालवण्यास जयंती चौहान यांनी नकार का दिला? पाच मुद्दे

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'कोणासोबत तुम्ही डान्स करताय?'. तर दुसऱ्याने 'धोनीला पाहून बरे वाटले' असे लिहिले आहे. आणखी एका युजरने, 'विजय असेल तेव्हा उत्सव होईल'. आणखी एका युजरने लिहिले आहे, 'Get them just dance'. एकूणच या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com