Ruturaj Gaikwad & Utkarsha Pawar Wedding Twitter/ @mufaddal_vohra
क्रीडा

Ruturaj Gaikwad Marriage Utkarsha Pawar: ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबेडीत, उत्कर्षा पवारसोबत घेतले सात फेरे

Ruturaj Gaikwad Marriage: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लग्नबेडीत अडकला आहे.

Manish Jadhav

Ruturaj Gaikwad Marriage: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लग्नबेडीत अडकला आहे. त्याने स्टार महिला क्रिकेटर उत्कर्षा पवारबरोबर सात फेरे घेतले.

तो कोणाबरोबर लग्न करणार असा प्रश्न मागील काही दिवसांपासून विचारला जात होता. मात्र आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार ऋतुराज 3-4 जून दरम्यान लग्न करणार असे सांगितले जात होते.

त्याचमुळे 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालची भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली.

दरम्यान, शनिवारी, 3 जून रोजी ऋतुराजने उत्कर्षा पवार सोबत एक नवीन इनिंग सुरु केली. उत्कर्षा ही एक क्रिकेटपटू आहे. जी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळते. ऋतुराजने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरुन पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले आहेत.

आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा एकत्र दिसले होते. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षाने महेंद्रसिंग धोनीचा आशीर्वादही घेतला होता.

त्यानंतर, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तूफान व्हायरल झाले होते. ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा महाबळेश्वरमध्ये विवाह संपन्न झाला.

ऋतुराजने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले

दुसरीकडे, या आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऋतुराजची टीम इंडियामध्ये निवड झाली होती, मात्र त्याने लग्नासाठी ब्रेक घेतला.

ऋतुराजची टीम इंडियामध्ये (Team India) स्टॅंडबाय खेळाडू म्हणून निवड झाली होती. ऋतुराजने स्वतः इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी दिली आहे.

उत्कर्षा महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते

उत्कर्षा महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. 24 वर्षीय उत्कर्षा मध्यमगतीने गोलंदाजी करते. तिने 2021 मध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळले आहे. पुण्यात (Pune) राहणारी उत्कर्षाही इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेसमध्ये शिकत आहे.

उत्कर्षा-ऋतुराजने मिळून आयपीएल ट्रॉफी उंचावली

आयपीएल 2023 हंगामाच्या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. त्यानंतर जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षा आणि ऋतुराजने मिळून आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. तेव्हापासून दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT