बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

Redmi Smartphone 2025: जुन्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल, तर आता तुमच्यासाठी पुढील महिन्यात एक असा नवीन स्मार्टफोन येणार आहे, जो 7000 mAh च्या दमदार बॅटरीने सुसज्ज असेल.
Redmi 15 5G:
Redmi 15 5GDainik Gomantak
Published on
Updated on

Redmi Smartphone 2025: जुन्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल, तर आता तुमच्यासाठी पुढील महिन्यात एक असा नवीन स्मार्टफोन येणार आहे, जो 7000 mAh च्या दमदार बॅटरीने सुसज्ज असेल. रेडमी इंडियाने या गोष्टीची पुष्टी केली की, पुढील महिन्यात Redmi 15 5G स्मार्टफोन 7000 mAh बॅटरीसह बाजारात आणला जाईल. केवळ बॅटरीचीच माहिती नव्हेतर कंपनीने अधिकृत लॉन्चिंगपूर्वी या फोनच्या प्रोसेसर (Processor), डिस्प्ले (Display) आणि कॅमेरा (Camera) डिटेल्सवरुनही पडदा उचलला आहे. चला तर मग जाणून घेऊया की, हा फोन कोणत्या दिवशी लॉन्च होणार आणि कोणत्या खास फीचर्ससह (Features) येणार?

Redmi 15 5G लॉन्च तारीख

रेडमी इंडियाने 'एक्स' (X) प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, हा आगामी स्मार्टफोन पुढील महिन्यात 19 ऑगस्ट (August 19) रोजी लॉन्च केला जाईल. हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये (Color Options) उपलब्ध असेल. जसे की, फ्रॉस्टेड व्हाइट (Frosted White), सँडी पर्पल (Sandy Purple) आणि मिडनाईट ब्लॅक (Midnight Black).

Redmi 15 5G स्पेसिफिकेशन्स (पुष्टी झालेली माहिती)

दरम्यान, या आगामी स्मार्टफोनसाठी ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर (Amazon) एक मायक्रोसाईट (Microsite) तयार करण्यात आली आहे. या मायक्रोसाईटवरुन फोनमध्ये मिळणाऱ्या काही खास फीचर्सची पुष्टी झाली आहे.

  • हा रेडमी मोबाईल 18 वॉट रिव्हर्स चार्ज सपोर्ट (18W Reverse Charge Support) आणि 7000 mAh बॅटरीसह लॉन्च केला जाईल.

  • कंपनीचा दावा आहे की, हा फोन 2 पट चांगली बॅटरी लाईफ (Battery Life) देईल आणि 1 टक्के हायबरनेशन मोडवरही (Hibernation Mode) फोन 13.5 तासांपर्यंतचा बॅकअप (Backup) देईल.

Redmi 15 5G:
Redmi Note 14 Pro 5G: DSLR सारखा येईल फोटो, रेडमीचा 'हा' 5G स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्तात
  • 700 mAh बॅटरी असूनही हा सर्वात स्लिम स्मार्टफोन (Thinnest Smartphone) असेल.

  • या फोनमध्ये 6.9 इंच डिस्प्ले (6.9-inch Display) मिळेल, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला (144Hz Refresh Rate) सपोर्ट करेल.

  • स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी (Multitasking) रेडमी 15 5जी मध्ये स्नॅपड्रॅगन 6एस जनरेशन 3 प्रोसेसर (Snapdragon 6S Gen 3 Processor), एआय फीचर्स (AI Features) जसे की, सर्कल टू सर्च (Circle to Search) आणि जेमिनी सपोर्ट (Gemini Support) यांसारख्या सुविधा मिळतील.

Redmi 15 5G:
बजेटमध्ये धमाका! 8200 mAh बॅटरीचा HMD T21 टॅब लॉन्च, OnePlus-Redmi ची चिंता वाढली

Redmi 15 5G फीचर्स

कॅमेरा सेटअपबद्दल (Camera Setup) बोलायचे झाल्यास, या फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सल ड्युअल एआय कॅमेरा सेन्सर (50MP Dual AI Camera Sensor) मिळेल. रेडमी 15 5जी च्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल (Operating System) बोलायचे झाल्यास, हा फोन अँड्रॉइड 15 (Android 15) आधारित हायपरओएस 2.0 (HyperOS 2.0) सह लॉन्च केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com