Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad 7 Sixes: ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम! एकाच षटकात ठोकल्या 43 धावा, पाहा Video

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका षटकात 7 सलग षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

विजय हजारे ट्रॉफी 2022 या चालू एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सोमवारी एकाच षटकात सलग 7 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात ही कामगिरी केली आहे. याबरोबरच अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात त्याने द्विशतकही झळकावले आहे.

ऋतुराज सध्या दमदार लयीत आहे. त्याची हीच लय उत्तर प्रदेशविरुद्धही कायम राहिली. त्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) डावातील 49 व्या षटकात उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंग विरुद्ध सलग 7 षटकार मारले.

ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) या षटकातील पहिल्या चार चेंडूवर षटकार ठोकले. पण, नंतर 5 वा चेंडू नो-बॉल ठरला होता, पण यावरही ऋतुराजने षटकार मारला. तसेच त्याने शिवा सिंगने पुन्हा टाकलेल्या 5 व्या चेंडूवरही षटकार ठोकला. त्यामुळे या षटकात त्याच्या नावावर सलग 7 षटकारांची नोंद झाली. त्याने या षटकात या 7 षटकारांसह तब्बल 43 धावा केल्या.

दरम्यान, त्याने या सामन्यात एकूण 159 चेंडूत 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 षटकार आणि 10 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त महाराष्ट्राकडून या सामन्यात अंकित बावणे आणि अझिम काझीने प्रत्येकी 37 धावांची खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्राने 50 षटकांत 5 बाद 330 धावा केल्या.

ऋतुराज दमदार लयीत

ऋतुराजने याच स्पर्धेत आधी रेल्वेविरुद्ध 124 धावांची खेळी केली होती. तसेच बंगालविरुद्ध 40 धावा केल्या होत्या. त्याआधी त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2022 स्पर्धेतही दोन शतके झळकावलेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT