RCB Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चूकीला माफी नाही! विराटला 24 लाखांचा दंड, तर RCB संघावरही कारवाई, 'हे' आहे कारण

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रभारी कर्णधार विराट कोहली आणि संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli and RCB Team fined: रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला. पण या विजयानंतर विराट आणि बेंगलोर संघावर आयपीएलच्या आचार संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे.

या सामन्यात बेंगलोरने निर्धारित वेळेत त्यांची षटके पूर्ण न केल्याने त्यांना आयपीएलमधील आचार संहितेतील नियमानुसार दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

आयपीएलकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे की विराट कोहलीवर षटकांची गती कमी राखल्याबद्दल कर्णधार म्हणून 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच त्या सामन्यात खेळलेल्या बेंगलोरच्या खेळाडूंनाही दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांना 6 लाखाचा किंवा सामना शुल्काच्या 25 टक्के, यातील जो कमी असेल तो दंड भरावा लागणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे या सामन्यात बेंगलोरला षटकांची गती कमी राखल्याबद्दल पेनल्टीलाही सामोरे जावे लागले होते. त्यांना अखेरच्या षटकात केवळ चार क्षेत्ररक्षकच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता आले होते.

बेंगलोरकडून षटकांची गती कमी राखण्याची चूक या हंगामात दुसऱ्यांदा झाली आहे. यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 10 एप्रिलला झालेल्या सामन्यातही बेंगलोरकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यावेळी बेंगलोरचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिसला 12 लाखांचा दंड झाला होता.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना फाफ डू प्लेसिसला बरगड्यांजवळ दुखापत झाली आहे. त्यामुळे तो काही दिवसांसाठी क्षेत्ररक्षण करू शकत नसल्याने विराटने पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध बेंगलोरचे नेतृत्व केले आहे. फाफ क्षेत्ररक्षण करत नसला, तरी इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टीट्यूट म्हणून गेल्या दोन्ही सामन्यात खेळला असून त्याने फलंदाजी करताना अर्धशतकेही केली आहेत.

सध्या बेंगलोर संघ हंगामातील 34 सामन्यांनंतर गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी या हंगामात 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT