Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Record: RCB साठी खेळताना किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! धोनीलाही टाकलंय मागे

विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना खेळताना वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli 250 Matches for RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी (14 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात 60 वा सामना होत आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेला हा सामना बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी खूप खास आहे. त्याने या सामन्यात खेळताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

विराटचा हा बेंगलोरसाठी 250 वा सामना ठरला आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी 250 सामने खेळणारा विराट जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आला नव्हता.

टी20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराट पाठोपाठ एमएस धोनी आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी आत्तापर्यंत 240 सामने खेळले आहेत.

त्यापाठोपाठ समित पटेल असून त्याने नॉटिंघमशायर संघासाठी सर्वाधिक 220 टी20 सामने खेळले आहेत. त्यानंतर कायरन पोलार्ड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी 211 सामने खेळले आहेत. या यादीत पाचव्या क्रमांकावर स्टिव्हन क्रॉफ्ट असून त्याने लंकाशायरसाठी 209 सामने खेळले आहेत.

विराट बेंगलोरचा प्रमुख खेळाडू

विराटला बेंगलोरने 2008 साली आयपीएल लिलावात खरेदी केले होते. तेव्हापासून विराट बेंगलोरकडून खेळत आहे. त्याने काही वर्षे बेंगलोरचे नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली 2016 साली बेंगलोर आयपीएलच्या अंतिम सामन्यातही पोहोचले होते. विराट बेंगलोर संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातो.

विशेष म्हणजे आयपीएलच्य सर्व 16 हंगामात एकाच संघाकडून खेळणारा विराट एकमेव क्रिकेटपटूही आहे. दरम्यान विराट त्याच्या बेंगलोरसाठी 250 व्या सामन्यात खेळताना फलंदाजीत मात्र काही खास करू शकला नाही. तो केवळ 18 धावांवर बाद झाला.

त्यामुळे आता त्याच्या बेंगलोरसाठी 250 सामने खेळताना 36.51 च्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 7486 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराटने 250 सामन्यांपैकी 235 सामने बेंगलोरसाठी आयपीएलमध्ये खेळले आहेत. यामध्ये त्याने 7062 धावा केल्या आहेत. त्याने अन्य 15 सामने आयपीएल व्यतिरिक्त चॅम्पियन्स लीग सारख्या स्पर्धांमध्ये बेंगलोरकडून खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, वार्का येथील घटना; संशयिताचा जामीन गोवा खंडपीठाने फेटाळला

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्रातून दुःखद बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

SCROLL FOR NEXT