Ross Taylor Dainik Gomantak
क्रीडा

'R R च्या मालकानं माझ्या कानशिलात लगावली'; रॉस टेरलचा खळबळजनक खुलासा

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंड संघाचा (New Zealand) माजी कर्णधार रॉस टेलर (Ross Taylor) याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही (IPL) बरेच सामने खेळले आहेत. पण राजस्थान रॉयल्स संघाकडून 2011 साली खेळताना त्याच्यासोबत घडलेला एक खळबळजनक खुलासा त्याने नुकताच सर्वांसोबत शेअर केला आहे. राजस्थान रॉयल्सच्या एका मालकाने रॉस एका सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला 3 ते 4 वेळा कानशिलात लगावल्याचा धक्कादायक खुलासा रॉसने यावेळी केला आहे. रॉस टेलरने नुकतेच त्याचे ब्लॅक अँड व्हाईट हे आत्मचरित्र लिहिलं त्यामध्ये त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. (Ross Taylor revealed that the IPL place in 2011 was slapped by the Royals owner)

रॉस टेलरने याबद्दल सांगितले की, ''आयपीएल खेळताना असं काही माझ्यासोबत घडेल असा मी कधी विचारही केला नव्हता. 2011 साली मोहाली येथे एका सामन्यादरम्यान मी शून्य धावा करुन बाद झालो होतो. त्यानंतर एका राजस्थान रॉयल्सच्या मालकाने मला 3 ते 4 वेळा कानाखाली लगावली होती. ही कानशिलात जोरात नव्हती, कदाचित त्यांनी मस्करीत मारलं असेल पण हे करताना आम्ही तुला इतके हजारो डॉलर्स शून्यावर बाद होण्यासाठी देत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आयपीएलसारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर खेळताना अशाप्रकारच्या वागणूकीचा विचार देखील करत नाही.'' रॉसने यावेळी बोलताना न्यूझीलंडच्या क्रिकेटरुममध्येही वर्णभेदाचा अनेकदा सामना करावं लागल्याचा खुलासा देखील केला.

रॉस टेलरचं 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

रॉस टेलरनं 2006 मध्ये न्यूझीलंडकडून पहिला एकदिवसीय सामना खेळला होता आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्याची संधी देखील मिळाली. टेलरनं 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,593 धावा आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,909 धावा केल्या आहेत तर त्यानं आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळले आणि ज्यामध्ये त्याने 7,683 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या 19 शतकांचा देखील समावेश आहे.

शेवटच्या सामन्यात रॉस टेलर 14 धावांवर बाद

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रॉस टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. शेवटच्या सामन्यात त्याला क्रीजवर येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली आहे. मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 203 धावांच्या भागीदारीमुळं त्याला 39व्या ओव्हरमध्ये क्रीझवर यावं लागलं. तो मैदानात येताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले होते. 14 धावांवर बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य देखील होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT