Novak Djokovicला कोविड लस न घेण पडलं महाग, सिनसिनाटी ओपनमधून बाहेर

न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनलाही तो खेळू शकणार नाही.
Novak Djokovic
Novak DjokovicDainik Gomantak
Published on
Updated on

21 वेळेला ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोवाक जोकोविच (Novak Djokovic) कोरोनाविरूद्ध लसीकरण न केल्यामुळे तो अमेरिकेला जाऊ शकणार नाहीये आणि या कारणास्तव त्याला सिनसिनाटी ओपन हार्डकोर्ट स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनलाही तो खेळू शकणार नाही. (Novak Djokovic pulls out of Cincinnati Open after not taking Corona vaccine)

Novak Djokovic
CWG रौप्यपदक विजेता भालाफेकपटू अँडरसन पीटर्सवर पाच जणांनी हल्ला करून बोटीतून फेकले- Video

सर्बियाच्या 35 वर्षीय जोकोविचने आधीच सांगितले आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी त्याला लस घेणार नाही आहे. यामुळेच जोकोविच जानेवारीतील ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकेतील दोन स्पर्धा खेळू शकला नाही. मॉन्ट्रियलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतूनही तो बाहेर आहे कारण त्याला अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे कारण कोरोनाविरूद्ध लसीकरण केलेले नाही.

गतविजेते अलेक्झांडर झ्वेरेव्ह, गेल मॉनफिल्स, रिली ओपेल्का आणि डॉमिनिक थिएम यांनाही दुखापतीमुळे सामन्यासाठी मुकावे लागणार आहे. सेरेना विल्यम्स येथे ती खेळत आहे आणि या दौऱ्यातील तिची ही शेवटची स्पर्धा असू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com