Rosary College Navelim Womens Football Team Dainik Gomantak
क्रीडा

Womens Football: रोझरी महाविद्यालयाने अजिंक्यपद राखले; अंतिम लढतीत सेंट झेवियर्सवर एका गोलने मात

अंतिम सामना सोमवारी ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाला.

किशोर पेटकर

Goa University Inter-Collegiate Football Championship: चुरशीच्या अंतिम लढतीत गतविजेत्या नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाने म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयास १-० असे नमवून गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद राखले. अंतिम सामना सोमवारी ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाला.

स्पर्धा सलग तीन वर्षे जिंकण्याचा पराक्रम रोझरी महाविद्यालयाने साधता. यापूर्वी त्यांनी २०१९-२० व २०२२-२३ मध्ये विजेतेपद मिळविले होते.

मध्यंतरी (२०२०-२१, २०२१-२२) कोविडमुळे स्पर्धा झाली नव्हती. सोमवारी रोझरी महाविद्यालयाच्या विजयात रिया पिरीस हिने सातव्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला.

रिया हिलाच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस मिळाले. गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांच्यासह मिल्टन फर्नांडिस, कॉलिन वाझ, फ्रान्सिस लोबो, भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT