Syed Mushtaq Ali Trophy 2023: गोव्याच्या विजयात कर्णधार दर्शनचे अष्टपैलूत्व खुलले

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत आंध्रला नमविले
Darshan Misal captain of Goa Cricket Team
Darshan Misal captain of Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Syed Mushtaq Ali Trophy 2023 Update: कर्णधार दर्शन मिसाळची शानदार अष्टपैलू कामगिरी, आंतरराष्ट्रीय राहुल त्रिपाठीची उपयुक्त फलंदाजी, तसेच अर्जुन तेंडुलकर व लक्षय गर्ग यांनी निर्णायक टप्प्यावर बाद केलेले गडी यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने सोमवारी विजयी सलामी दिली.

झारखंडमधील रांची येथे झालेल्या स्पर्धेच्या ‘क’ लढतीत आंध्रला ३१ धावांनी नमविले. आंध्रने नाणेफेक जिंकल्यानंतर गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोव्याने ६ बाद २३२ धावांची मजल मारली.

Darshan Misal captain of Goa Cricket Team
Dikarpal Davorlim Panchayat: दवर्ली-दिकरपालच्‍या सरपंच व उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल

नंतर आंध्रचा डाव २०१ धावांत संपुष्टात आला तेव्हा डावातील नऊ चेंडू बाकी होते. दर्शनने आक्रमक अर्धशतक नोंदविताना २७ चेंडूंत पाच चौकार व पाच षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या, नंतर त्याने दोन गडीही बाद केले.

राहुल त्रिपाठी व ईशान गडेकर यांनी गोव्याला ४६ चेंडूंत ७० धावांची सलामी दिली. नंतर राहुलने दर्शनसमवेत दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला बाराव्या षटकात सव्वाशे धावा करणे शक्य झाले.

डावातील अखेरच्या २३ चेंडूंत के. व्ही. सिद्धार्थ व ‘इमॅक्ट खेळाडू’ तुनीष सावकार यांनी तुफानी फलंदाजी केल्यामुळे गोव्याने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ६६ धावांची अभेद्य भागीदारी केली.

अश्विन हेब्बर व श्रीकर भारत यांनी दिलेली आक्रमक अर्धशतकी सलामी आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकानंतरही २ बाद १४७ वरून आंध्रचा डाव गडगडला. लक्षयने १८व्या षटकात तिघांना बाद केले, तर १९व्या षटकात सलग चेंडूंवर दोघांना बाद करून अर्जुन तेंडुलकरने आंध्रचा डाव संपविला.

संक्षिप्त धावफलक

गोवा: २० षटकांत ६ बाद २३२ (ईशान गडेकर ३५- २४ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, राहुल त्रिपाठी ४७- ३४ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, दर्शन मिसाळ ६१- २७ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, सुयश प्रभुदेसाई ४, मोहित रेडकर ६, दीपराज गावकर ३, तुनीष सावकार नाबाद ३४- ११ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, के. व्ही. सिद्धार्थ नाबाद ३२- १२ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, पृथ्वी राज २-५०, हरिशंकर रेड्डी २-३९) वि

वि. आंध्र: १८.३ षटकांत सर्वबाद २०१ (अश्विन हेब्बर ३१, श्रीकर भारत ३१, हनुमा विहारी ५८- ३३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, शेख रशीद २७, रिकी भुई १७, अर्जुन तेंडुलकर ३.३-०-४६-३, शुभम तारी ३-०-३४-२, लक्षय गर्ग ४-०-४०-३, दर्शन मिसाळ ४-०-३१-२, विकास सिंग ३-०-२८-०, मोहित रेडकर १-०-१४-०).

Darshan Misal captain of Goa Cricket Team
Canacona: धक्कादायक! एकाच दिवशी दोन सख्या भावांचा हृदयविकाराने मृत्यु; अर्धफोंड- पैगीण येथील घटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com