Rohit Sharma Fifty | India vs Sri Lanka 1st Odi Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: रोहित पुन्हा भावूक! 'या' फॅमिली मेंबरसाठी केलं अर्धशतक समर्पित?

रोहित शर्माने अर्धशतकनंतर केलेल्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Pranali Kodre

India vs Sri Lanka 1st Odi: भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. गुवाहाटीमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 373 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने शतक केले, तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकावली.

दरम्यान, रोहित शर्माने अर्धशतक केल्यानंतर ज्याप्रकारे कृती केली, ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण त्याने अर्धशतक झाल्यानंतर आकाशाकडे पाहून काहीतरी शब्द उच्चारले.

त्याने हे अर्धशतक त्याच्या पाळीव कुत्र्याला समर्पित केल्याचा कयास अनेकांनी लावला. त्याच्या कुत्र्याचे सोमवारी निधन झाले. त्याबद्दल रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

दरम्यान, रोहितने 41 चेंडूत त्याचे हे अर्धशतक पूर्ण केले होते. त्याचे हे वनडेतील 47वे अर्धशतक आहे. पण रोहितला या अर्धशतकाचे रुपांतर शतकात करता आले नाही. त्याचे शतक केवळ 17 धावांनी हुकले. त्याने 67 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहितने शुभमन गिलबरोबर भारताच्या डावाला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्याने गिलबरोबर 143 धावांची सलामी भागीदारी रचली. गिलने 60 चेंडूत 70 धावांची खेळी केली.

रोहितने ही खेळी करताना वनडे क्रिकेटमध्ये 9500 धावांचा टप्पाही पार केला. हा टप्पा पार करणारा तो भारताचा 6 वा खेळाडू ठरला. त्याने 236 वनडे सामन्यांत 48.90 च्या सरासरीने 9537 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 29 शतके आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT