Rohit Sharma will not play for test Virat kohli out from ODI is all fine in team India

 

Dainik Gomantak

क्रीडा

रोहित टेस्ट मध्ये नाही तर कोहलीची वनडेतून माघार, टीम इंडियात सगळं आलबेल?

रोहितला कसोटी मालिकेतून आणि विराटला वनडे मालिकेतून माघार घेण्याचेही कारण आहे. रोहित शर्मा दुखापतीचा बळी ठरल्याने कसोटी मालिकेतून बाहेर पडला.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचं (Team India) कर्णधार पद संभाळल्यानंतर जरी रोहित शर्मा (Rohit Sharma) विराटची प्रशंसा करताना दिसत असला आणि विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना खूप मजा आली असे म्हणत असला तरी विराटला रोहीतच्या नेतृत्वात खेळायचं आहे का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. प्रथम रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आणि त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेत खेळणार नसल्याचीही बातमी आली. विराटने एकदिवसीय (ODI) मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय देखील बीसीसीआयलाही कळवला आहे.(Rohit Sharma will not play for test Virat kohli out from ODI is all fine in team India)

रोहितला कसोटी मालिकेतून आणि विराटला वनडे मालिकेतून माघार घेण्याचेही कारण आहे. रोहित शर्मा दुखापतीचा बळी ठरल्याने कसोटी मालिकेतून बाहेर पडला. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग होऊ शकत नाही.त्याचवेळी विराटने वनडे मालिकेतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले नसले तरी त्याचा कौटुंबिक ब्रेकशी संबंध जोडला जात आहे. वास्तविक, ज्या वेळी 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, त्या वेळी त्यांची मुलगी वामिकाचाही पहिला वाढदिवस आहे. वृत्तानुसार, विराटने बीसीसीआयला हाच युक्तिवाद देत मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तथापि, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून माघार घेण्यामागे विराट आणि रोहित यांच्यात व्हाइट बॉल कर्णधारपदाचा वाद आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, त्याबाबत अटकळ बांधली जात आहे. खरंतर विराट कोहली अजून एकदिवसीय कर्णधारपद सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण, गेल्या आठवड्यात बीसीसीआयने त्याला हटवून रोहितला वनडेचा कर्णधार बनवले.मात्र, यावर कोहलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा पत्रकार परिषदही घेतली नाही. विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो पण त्याने तिथेही याबद्दल काहीही लिहिले नाही. पण विराटच्या जवळच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर या निर्णयामुळे त्याला नक्कीच धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT