Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: या 5 भारतीय फलंदाजांनी T20 World Cup मध्ये केल्या सर्वाधिक धावा

Rohit Sharma T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होणाऱ्या T20 विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होणाऱ्या T20 विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व क्रिकेट चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आज आमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.

दरम्यान, सध्याचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने T20 विश्वचषक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 33 सामन्यांमध्ये 38.50 च्या सरासरीने 847 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 8 अर्धशतके झळकावली आहेत. 2007 पासून तो प्रत्येक T20 मध्ये भाग घेत आहे. तो तूफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी तो टीम इंडियाचा (Team India) कर्णधारही आहे.

तसेच, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा सर्वात विश्वासू फलंदाज आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जेव्हा तो आपल्या लयीत असतो, तेव्हा गोलंदाजांची पळताभुई होते. त्याने टी-20 विश्वचषकात 21 सामन्यांत 845 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, युवराज सिंग त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जात होता. त्‍याने टी-20 विश्‍वचषकातील 31 सामन्‍यात 593 धावा केल्या आहेत. 2007 मध्ये त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारुन विक्रम केला होता. युवराज सिंगने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

शिवाय, महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 टी-20 विश्वचषक जिंकला होता. धोनीने टी-20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये 529 धावा केल्या आहेत. तो जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

याशिवाय, गौतम गंभीरची स्फोटक सलामीवीरांमध्ये गणना होते. 2007 साली झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने 72 धावांची शानदार खेळी खेळली होती. T20 विश्वचषकातील 21 सामन्यांत त्याने 520 धावा केल्या आहेत. 2018 मध्ये गंभीर निवृत्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT