T20 World Cup 2022: काही कळलचं नाही! टीम इंडियाचा अचानक बदलला कर्णधार

India vs Western Australia Practice Match: T20 विश्वचषक 2022 च्या तयारीपूर्वी भारतीय संघ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळत आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Indian Team For T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 च्या तयारीपूर्वी भारतीय संघ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळत आहे, मात्र दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा 36 धावांनी पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर सराव सामन्यात टीम इंडियाने रोहित शर्माऐवजी दुसऱ्या खेळाडूला कर्णधार बनवले. चला तर मग असा निर्णय का घ्यावा लागला त्याबद्दल जाणून घेऊया...

या खेळाडूला कर्णधार बनवले

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने (Team India) केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली. तर रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाने असे का केले हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. तर T20 विश्वचषकात (T20 World Cup) टीम इंडियाला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. T20 विश्वचषक 2022 चा सामना भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Team India
T20 World Cup: जगातील सर्वात खूंखार गोलंदाज ऑस्ट्रेलियन भूमीवर उतरणार, भारतातून झाला रवाना

राहुलने अर्धशतक ठोकले

दुसऱ्या सराव सामन्यात केएल राहुलने झंझावाती अर्धशतक ठोकले. त्याच्याशिवाय मात्र एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. याच कारणामुळे टीम इंडियाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. शानदार फलंदाजी करताना राहुलने 55 चेंडूत 74 धावा केल्या. मात्र तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याचवेळी या सामन्यात रोहित शर्मा नक्कीच खेळला, पण तो फलंदाजीला आलाच नाही.

Team India
भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, हा गोलंदाज T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

टीम इंडियाचा पराभव झाला

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला 169 धावांचे लक्ष्य दिले, परंतु टीम इंडियाला 20 षटकांत केवळ 132 धावाच करता आल्या, मात्र सामना 36 धावांनी गमवावा लागला. केएल राहुलने विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. ऋषभ पंतने 9, दिनेश कार्तिकने 10 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी, दीपक हुड्डालाही मोठी खेळी खेळता आली नाही. दुसरीकडे, गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनने 3 आणि हर्षल पटेलने 2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com