Rohit Sharma New Record Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma New Record: हिटमॅन रोहित शर्माने मोहम्मद अझरुद्दीनला टाकले मागे

सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हिटमॅन रोहितची सहाव्या स्थानावर झेप

Akshay Nirmale

Rohit Sharma New Record: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बांग्लादेशविरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात एक नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. रोहितने केवळ 27 धावांची खेळी केली असली तरी या खेळीतच हा रेकॉर्ड त्याच्या नावावर साकारला आहे. (Rohit Sharma Most ODI Runs For India)

हिटमॅन रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याला मागे टाकले आहे. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित आता सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या नावावर 9403 धावा आहेत. तर मोहम्मद अजहरुद्दीन यांनी त्यांच्या कारकीर्दीत 9378 धावा केल्या आहेत. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने वनडेमध्ये 18426 धावा केल्या आहेत.

रोहितने बांग्लादेशविरूद्धच्या खेळीत 31 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह सत्तावीस धावा केल्या. पण शाकिब अल हसनच्या एका चेंडुवर तो बोल्ड झाला.

वनडे मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर - 18426

विराट कोहली - 12344

सौरव गांगुली - 11221

राहुल द्रविड - 10768

महेंद्रसिंग धोनी - 10599

रोहित शर्मा - 9403

मोहम्मद अझरुद्दीन - 9378

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT