Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 साठी टीम इंडियात संधी न मिळालेल्या खेळाडूंसाठी कर्णधार रोहितचा खास सल्ला, म्हणाला....

India Sqaud for World Cup 2023: 'मी त्यातून गेलो, त्यामुळे मला माहित आहे...', वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंना रोहितने सल्ला दिला आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Special Message to Players who missed out from ODI World Cup Indian Squad:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (5 सप्टेंबर) वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ घोषित केला आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाकडून सध्या आशिया चषकात खेळत असलेल्या अनेक खेळाडूंना वर्ल्डकपसाठीही संधी मिळाली आहे. मात्र, असे असले तरी संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा यांना संघातून वगळण्यात आले आहे.

त्याचबरोबर अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहललाही संधी देण्यात आलेली नाही. याशिवाय २०१९ मध्ये खेळलेल्या शिखर धवन, भुवनेश्वर कुमार या खेळाडूंनाही संधी मिळालेली नाही.

तथापि, ज्या खेळाडूंना वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी संधी मिळालेली नाही, अशा खेळाडूंना भारताचा कर्णधार रोहित शर्माने खास सल्ला दिला आहे.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्मा आणि निवड समितीचा अध्यक्ष अजित अगरकर उपस्थित होते.

यावेळी संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंना उद्देशून रोहित शर्मा म्हणाला, 'काही खेळाडू आहेत, ज्यांची निवड झालेली नाही. पण ही गोष्ट प्रत्येक वर्ल्डकपमध्ये होते. निराशा नक्कीच असेल, पण आम्ही फक्त 15 जणांना संघात संधी देऊ शकतो.'

'भारतात खूप प्रतिभा आहे, त्यामुळे सर्वांना संधी देणे कठीण आहे. मी सुद्धा यातून गेलो आहे आणि मला माहित आहे, कसे वाटते. तुम्ही तुमची मान ताठ ठेवा. संघात चांगला समतोल राहावा आणि चांगले अष्टपैलू पर्याय असावेत, याचसाठी फक्त आमचा प्रयत्न होता. आम्ही निवडू शकणारे हे सर्वोत्तम 15 खेळाडू होते.'

याशिवाय रोहितने असेही म्हटले की सामन्यांच्या वेळी परिस्थितीनुसार आम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळवायचे याचा निर्णय घेऊ.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT