Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: 'जडेजाचा तो कॅच...', रोहितने सांगितली वर्ल्डकपमधील अविस्मरणीय आठवण

World Cup: रोहित शर्माने त्याच्या वर्ल्डकपच्या अविस्मरणीय आठवणी सांगितल्या आहेत.

Pranali Kodre

Rohit Sharma recalled memories of World Cup Ajay Jadeja catch in 1992:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. 12 वर्षांनंतर भारतात वर्ल्डकप होणार आहे. असे असले तरी पहिल्यांदाच भारत स्वतंत्रपणे वनडे वर्ल्डकप आयोजित करणार आहे. या वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.

त्यापूर्वी, वर्ल्डकपची ट्रॉफी जगभरातील वेगवेगळ्या देशात फिरवली जात आहे. नुकतीच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतही ही ट्रॉफी पोहचली होती. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्याने यावेळी त्याची प्रतिक्रिया देताना त्याच्या वर्ल्डकपच्या आठवणीही सांगितल्या.

आयसीसीशी बोलताना रोहित म्हणाला, 'मी ट्रॉफी इतक्या जवळून कधीही पाहिली नव्हती. जेव्हा आम्ही 2011 मध्ये जिंकलो, तेव्हाही मी संघाचा भाग नव्हतो. पण हो, ही खूप सुंदर दिसत आहे. अनेक आठवणी या ट्रॉफीच्या मागे आहेत. आशा आहे की आम्ही ही ट्रॉफी उंचावू.'

रोहितने सांगितल्या वर्ल्डकपच्या आठवणी

रोहितने वर्ल्डकपच्या आठवणीही सांगितल्या आहेत. त्याने सांगितले की 'आठवणी अनेक आहेत. पण मी 1987 साली जन्मलो, त्यामुळे मला 1992 सालचा वर्ल्डकप लक्षात आहे, जो पाकिस्तानने जिंकला होता.'

'पण मला भारताकडून अजय जडेजाने घेतलेला तो प्रसिद्ध झेलही आठवतो. जर मी चूकत नसेल, तर त्याने ऍलन बॉर्डरचा झेल घेतलेला. मला तो झेल लक्षात आहे कारण, त्याने सर्वांनाच अचंबित केले होते. त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला.'

रोहित पुढे म्हणाला, '1996 वर्ल्डकपही नक्कीच आठवतो, जो भारतातही खेळला गेला होता. दुर्दैवाने आपण उपांत्य सामन्यात पराभूत झालो. पण मला त्या वर्ल्डकपमधील प्रत्येक छोट्या गोष्टी लक्षात आहेत.'

'1999 वर्ल्डकपमधील देखील मला लक्षात आहे, त्या वर्ल्डकपमधील एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आहे की हर्षेल गिब्सने जो झेल सोडलेला, त्यामुळे त्यांना वर्ल्डकपची किंमत चुकवावी लाहली होती.'

रोहितने पुढे सांगितले, '2003 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत चांगला खेळला होता. तुम्हाला माहित आहे, सचिन तेंडुलकरने खूप शानदार फलंदाजी केली होती. 2007 वर्ल्डकपमध्ये आम्ही बाद फेरीसाठीही पात्र ठरू शकलो नव्हतो.'

'2011 सालचा वर्ल्डकप आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होता. मला आठवते मी प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू मी घरून पाहिला होता.'

'त्यावेळी दोन प्रकारच्या माझ्यात भावना होत्या. मी त्या संघाला भाग नसल्याने निराश होतो. त्यावेळी मी ठरवले होते की मी वर्ल्डकप पाहाणार नाही, पण नंतर पाहिला. दुसरी आठवण अशी की मला आठवते भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपासून शानदार कामगिरी केली होती.'

तसेच रोहितने असेही सांगितले की 2015 आणि 2019 वर्ल्डकप स्पर्धेचा तो भाग होता आणि त्याला ही स्पर्धा खेळून छान वाटले. पण त्यावेळी उपांत्य फेरीच्या पुढे भारताला जाता आले नव्हते.

रोहितने पुढे असंही सांगितले की आता वर्ल्डकप भारतात होत आहे आणि तुम्ही ही स्पर्धा एक-दोन दिवसात जिंकू शकत नाही, तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT