Rohit Sharma reacted on T20I World Cup 2024 Participation:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी (26 डिसेंबर) चालू होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग असणार आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत त्याला या कसोटी मालिकेबरोबरच पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 बद्दल आणि नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेबद्दलही प्रश्न विचारण्यात आले.
रोहित वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सलग 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात पराभव झाल्याबद्दल म्हणाला, 'ज्याप्रकारे आम्ही खेळलो, तेव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला यश मिळायला हवे. दुर्दैवाने आम्ही ते यश मिळवू शकलो नाही. हे कठीण आहे.'
'तुम्ही पाहिले की आम्ही 10 सामने कसे खेळले. अंतिम सामन्यात काही गोष्टी आमच्याकडून योग्य झाल्या नाहीत आणि आम्ही पराभूत झालो. हे कठीण होते, पण आयुष्यात खूप काही होत असते. खूप क्रिकेट आहे. तुम्हाला ताकद मिळवावी लागेल. मला त्या पराभवाच्या निराशेतून बाहेर यायला वेळ लागला, पण तुम्हाला पुढे जावेच लागते.'
'आम्हाला बाहेरून पण खूप पाठिंबा मिळाला आणि मला त्यामुळे पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होण्यासाठी प्रेरणा मिळाली.'
पुढीलवर्षी म्हणजेच जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप कॅरेबियन बेटांवर (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत खेळण्याबद्दल लवकरच उत्तर मिळेल, असे रोहितने म्हटले आहे.
रोहितला एका पत्रकाराने विचारले की 'तू विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहेस, असं म्हणालेला, त्याचा अर्थ टी20 वर्ल्डकप होता का?'
त्यावर रोहित म्हणाला, 'जेव्हाही खेळाडूंला संधी मिळते, तेव्हा त्यांनी कामगिरी करून दाखवायला हवी. मला माहित आहे, तुम्ही काय विचारण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला त्याचे उत्तर लवकरच मिळेल.'
दरम्यान, रोहित गेल्या वर्षभरापासून भारताकडून टी20 क्रिकेट खेळलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.