Rohit Sharma X/ICC
क्रीडा

IND vs AFG: '2007 साली सुरू झालेल्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी...' दुसऱ्या T20I विजयानंतर रोहितचं भाष्य

Rohit Sharma: रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा टी20 सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर रोहित शर्माने अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan 2nd T20I at Indore, Rohit Sharma:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (14 जानेवारी) अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. इंदूरला झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, हा सामना रोहित शर्मासाठी खास ठरला होता. हा त्याचा आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील 150 वा सामना होता. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 150 सामने खेळणारा पहिलाच पुरुष क्रिकेटपटू आहे. याबद्दलही रोहितने प्रतिक्रिया दिली.

रोहित म्हणाला, 'ही खूप छान भावना आहे. हा खूप मोठा प्रवास होता, जो २००७ साली चालू झालेला. मी या प्रकारात घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.'

रोहितने भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये 2007 टी20 वर्ल्डकपमधून इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते.

अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली - रोहित

दरम्यान, रविवारी भारताने अफगाणिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. या सामन्यान गोलंदाजांनी आणि फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. दरम्यान, ही मालिका भारताची जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपपूर्वीची अखेरची टी20 मालिका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.

याबद्दल रोहित म्हणाला, 'आम्हाला काय करायचे आहे याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना होती. सर्वांना स्पष्ट संदेश देण्यात आले होते. जेव्हा तुम्ही अशाप्रकारची कामगिरी पाहाता, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटतो. फक्त बोलणे ही एक गोष्ट, पण तिथे जाऊन त्याप्रकारे खेळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या दोन सामन्यात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.'

या सामन्यात भारताकडून 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी आक्रमक खेळ केला होता. या सामन्यात दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली.

तसेच यशस्वी जयस्वालने 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 173 धावांचे आव्हान 15.4 षटकातच पूर्ण केले. तसेच त्याआधी भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर चांगला मारा करत अफगाणिस्तानला 20 षटकात 172 धावांवर सर्वबाद केले होते.

रोहितने जयस्वाल आणि दुबेच्या खेळाचेही कौतुक केले. रहित म्हणाला, 'त्यांच्यासाठी गेली काही वर्षा चांगली ठरली आहेत. जयस्वाल आता कसोटी क्रिकेटही खेळला आहे आणि टी20 क्रिकेटही. त्याने त्याच्यातील क्षमता दाखवली आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे आणि चांगले शॉट्स आहेत.'

'दुबे उंच खेळाडू आहे, त्याच्यात खूप ताकद आहे आणि तो फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळतो. हीच त्याची भूमिका आहे. त्याने आमच्यासाठी गेल्या दोन डावात महत्त्वाची खेळी केली आहे.'

दुबेने मोहालीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती.

दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान संघात तिसरा टी20 सामना 17 जानेवारी रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

SCROLL FOR NEXT