Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: गिल किंवा विराट नव्हे, 'हा' धाकड खरा विजयाचा हिरो! कप्तान रोहित म्हणाला, जादूगार...!

India vs New Zealand 3rd ODI: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करुन तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand 3rd ODI: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करुन तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडिया वनडे क्रमवारीतही नंबर वन बनली आहे. संघाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

रोहितने सांगितले की कोणता खेळाडू जादूगार आहे

टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अनेक खेळाडूंचे कौतुक केले. त्याचवेळी रोहितने संघातील एका खेळाडूला जादूगार म्हटले. सामन्यानंतर रोहित म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही खेळलेल्या शेवटच्या 6 सामन्यांपैकी बहुतांश सामन्यांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली आहे. 50 षटकांच्या सामन्यांमध्ये हेच महत्त्वाचे आहे.''

रोहितने कुलदीपचे कौतुक केले

कुलदीप यादवबद्दल कर्णधार रोहित म्हणाला की, “जेव्हा-जेव्हा मी कुलदीपकडे चेंडू दिला, तेव्हा-तेव्हा त्याने विकेट्स मिळवून दिल्या. तर गिलचा दृष्टिकोन प्रत्येक सामन्यात सारखाच असतो. त्याला प्रत्येक सामन्याची नव्याने सुरुवात करायला आवडते. तर आजचे शतक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.''

टीम इंडिया रँकिंगमध्ये नंबर वन बनली

या मालिका विजयासह टीम इंडिया (Team India) वनडे रँकिंगमध्ये नंबर वन बनली आहे. मात्र, यामुळे रोहितवर फारसा फरक पडला नाही. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही क्रमवारीबद्दल फारसे बोलत नाही. आम्ही प्रामुख्याने मैदानावर योग्य गोष्टी करण्याबद्दल चर्चा करतो. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया हा दर्जेदार संघ आहे आणि आमच्यासाठी गोष्टी सोप्या नसतील पण मला खात्री आहे की, आम्ही त्यासाठी सज्ज होऊ.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT