Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Year Ending 2022: कॅप्टन्सी, मोठ्या स्पर्धा अन् दबाव! 1000 धावाही 'कॅप्टन' हिटमॅनसाठी...

रोहित शर्मासाठी २०२२ हे वर्ष आव्हानात्मक ठरलं आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma in 2022: साल 2022 वर्षातील आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत. या अखेरच्या दिवसाच भारतीय संघाला काही सामने खेळायचे आहेत. पण, आता कर्णधार रोहित शर्मा या उर्वरित सामन्यांत खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याला 7 डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

एकूण रोहित शर्मासाठी 2022 हे वर्ष तसं आव्हानात्मकच राहिले आहे. यावर्षी तो भारतीय संघाचा सर्व प्रकारांसाठी नियमित कर्णधार झाला. मात्र, त्याच्याकडून अपेक्षित परिणाम मिळाल्याचे दिसून आले नाही. मोठ्या स्पर्धांमध्येही त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला यश मिळवण्यात अपयश आले. तसेच रोहितची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही.

दबावात कर्णधार रोहितही अपयशी

रोहितने 2022 पूर्वी मुंबई इंडियन्सला त्याच्या नेतृत्वाखाली 5 आयपीएल ट्रॉफी जिंकवून देत त्याच्यातील नेतृत्व कौशल्य सिद्ध केले होते. तसेच त्याने अनेकदा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचेही नेतृत्व काही सामन्यांमध्ये सांभाळले होते.

त्यामुळे विराट कोहलीनंतर रोहितकडे 2022 वर्षात भारताच्या तिन्ही प्रकारातील संघांचे कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र, या वर्षात तो कर्णधार म्हणून मोठ्या स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरीपर्यंत पोहचू शकला नाही.

त्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला द्विपक्षीय मालिकांमध्ये विजय मिळवून दिले. मात्र, आशिया चषक आणि टी20 वर्ल्डकप यांसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दबावाखाली तो संघाला आत्मविश्वास देण्यात अपयशी ठरला. त्याच्यावर या स्पर्धांमध्ये नेतृत्वाचा दबाव आल्याचे स्पष्ट दिसून आले. अनेकदा त्याचा याच दबावाच्या परिस्थितीत रागाचा पाराही चढलेला दिसला.

तसेच त्याने स्वत: देखील मोठ्या स्पर्धांमध्ये येणारा दबाव हा द्विपक्षीय मालिकांपेक्षा अधिक असल्याचे मान्य केले. भारताला आशिया चषकात देखील अंतिम सामन्यापर्यंत मजल मारता आली नाही. अगदी भारतीय संघ केवळ एकच सामना सुपर फोर फेरीत जिंकू शकला.

तसेच नंतर झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्येही त्याची वैयक्तिक कामगिरीही तेवढी चांगली राहिली नाही आणि भारतीय संघही उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभूत होत बाहेर पडला.

तसेच नुकताच तो भारताचा नियमित कर्णधार झाल्यापासून पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका पराभूत झाला. भारताला बांगलादेश दौऱ्यात वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसला आहे.

इतकंच नाही, तर रोहितसाठी कर्णधार म्हणून यंदाचे वर्ष आयपीएलमध्येही कठीण ठरले. त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला केवळ 4 सामने जिंकता आले आणि ते गुणतालिकेतही शेवटच्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहाण्यास सुरुवात झाली आहे.

वयक्तिक कामगिरीतही घसरण

केवळ कर्णधार म्हणून नाही, तर वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत देखील रोहितच्या कामगिरीत घसरण झालेली दिसली. त्याने यावर्षात 1000 धावांचाही टप्पा पार केला नाही.

त्याने संपूर्ण वर्षात आत्तापर्यंत 39 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 40 डावात फलंदाजी केली. त्यात त्याने 27.63 च्या सरासरीने 995 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याला या वर्षात एकही शतक करता आलेले नाही. त्याची यावर्षी नाबाद 76 धावा ही सर्वोच्च खेळी राहिली.

इतकंच नाही, तर त्याला या वर्षांत अनेक सामन्यांना दुखपतीमुळे मुकावे लागले. तो वर्षाच्या सुरुवातीलाही दुखापतीमुळेच दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला होता. आता वर्षाच्या शेवटीही तो दुखापतीमुळेच भारतीय संघाच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

पण असे असले तरी यावर्षी त्याने एक मोठा विक्रम त्याच्या नावावर केला. त्याने नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा टप्पा पार केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा भारताचा पहिला, तर जगातील दुसरा खेळाडू ठरला.

आता रोहित 2023 मध्ये त्याच्या कामगिरीत सुधारणा करणार का हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT