Rohit Sharma Mumbai Indians Captain Suryakumar Yadav Reaction Dainik Gomantak
क्रीडा

Leader Brother Mentor... रोहित शर्माकडे पुन्हा मुंबई इंडियन्सची कर्णधारपदाची धुरा; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया व्हायरल!

Rohit Sharma Mumbai Indians Captain: आयपीएल 2027 च्या हंगामाआधीच मुंबई इंडियन्सने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

Rohit Sharma Mumbai Indians Captain Suryakumar Yadav Reaction

आयपीएल 2027 च्या हंगामाआधीच मुंबई इंडियन्सने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेतला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी फ्रँचायझीने अधिकृतपणे ही घोषणा केली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही रोहितच्या नव्या कर्णधारपारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यानेही या निर्णयावर खास प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवची खास पोस्ट; म्हणाला, 'पलटन, तयारी करून घ्या!'

रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने आनंद व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्सने रोहितच्या पुनरागमनाची घोषणा करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सूर्याने 'तयारी करून घ्या पलटन' अशा आशयाची कमेंट केली. त्यासोबत त्याने निळ्या रंगाचे हार्ट इमोजीही शेअर केले.

इतकेच नाही, तर सूर्यकुमारने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही रोहितसाठी खास संदेश लिहिला. त्याने रोहितचा उल्लेख 'लीडर, भाऊ आणि मेंटॉर' असा करत चाहत्यांना उद्देशून 'पलटन, खुर्चीच्या पट्ट्या बांधून घ्या!' असे म्हटले. सूर्याच्या या मजेशीर आणि उत्साहपूर्ण प्रतिक्रियेमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी हंगामात रोहितच्या नेतृत्वाखाली संघाकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असल्याचेही या प्रतिक्रियेतून दिसून येते.

हार्दिक पांड्यानंतर पुन्हा रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई इंडियन्सने 2023 मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर रोहितने खेळाडू म्हणून संघासाठी योगदान दिले. मात्र, आता आगामी आयपीएल हंगामासाठी फ्रँचायझीने पुन्हा एकदा नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या ट्रेड डीलद्वारे पंजाब किंग्सचा भाग झाल्यानंतर रोहितकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने जिंकली पाच विजेतेपदे

रोहित शर्माची मुंबई इंडियन्ससोबतची कर्णधार म्हणून कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली आहे. 2013 मध्ये त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यानंतर 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा पाच हंगामांमध्ये मुंबईने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रोहितच्या नेतृत्वगुणांमुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक बनला.

मात्र, 2023 मध्ये हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवल्यानंतर संघाच्या कामगिरीत अपेक्षित सातत्य दिसून आले नाही. आता तीन वर्षांनंतर रोहित पुन्हा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत..

मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन बनवण्याचे रोहितसमोर आव्हान

आगामी आयपीएलमध्ये रोहित शर्मासमोर मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याचे मोठे आव्हान असेल. पाच वेळा चॅम्पियन बनवलेल्या संघाचे नेतृत्व पुन्हा स्वीकारताना त्याला आपल्या अनुभवाचा फायदा होणार आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवसारखे आक्रमक फलंदाज संघात असल्याने मुंबईची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे. आता रोहितच्या पुनरागमनानंतर मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: एसटी आरक्षण कायद्याचे सरकारकडून जोरदार समर्थन; मतदारसंघांच्या सीमांत बदल होणार नाही

Indian Super League: चर्चिल ब्रदर्सचा विजयी कमबॅक; इंटर काशीला 1-0 ने नमवत पराभवांची मालिका खंडित

One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

रिंगमधील 'तो' सामना ठरला अखेरचा! Crown Jewel मध्ये भीषण धडक! बरगड्या अन् किडनीला दुखापत, वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी WWE सुपरस्टारचं निधन

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

SCROLL FOR NEXT