Rohit Sharma BCCI
क्रीडा

Rohit Sharma: हिटमॅनचा 'मिस्टर 360'ला धक्का! ODI मध्ये ठरला बेस्ट 'सिक्स हिटर', 4 रेकॉर्ड्स नावावर

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Rohit Sharma Fifty Records:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स संघात अखेरचा साखळी सामना खेळवला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक ठोकत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

रोहितने या सामन्यात 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. त्यामुळे रोहित हा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने एबी डिविलियर्सच्या 58 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

रोहितचे आता 2023 वर्षात वनडेमध्ये 60 षटकार मारले आहेत. तो एका वर्षात वनडेत 60 षटकार मारणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. डिविलियर्सने 2015 साली वनडेमध्ये 58 षटकार मारले होते.

  • एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

    • 60 षटकार - रोहित शर्मा (2023)

    • 58 षटकार - एबी डिविलियर्स (2015)

    • 56 षटकार - ख्रिस गेल (2019)

    • 48 षटकार - शाहिद आफ्रिदी (2002)

मॉर्गनलाही टाकलं मागे

रोहित एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधारही ठरला आहे. त्याने 2023 वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत 24 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याने ओएन मॉर्गनला मागे टाकले आहे.

  • एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार -

    • 24 षटकार - रोहित शर्मा (2023)

    • 22 षटकार - ओएन मॉर्गन (2019)

    • 21 षटकार - एबी डिविलियर्स (2015)

    • 18 षटकार - ऍरॉन फिंच (2019)

    • 17 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम (2015)

रोहितच्या 500 धावा पूर्ण

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेमध्ये रोहित शर्माने 500 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्यामुळे तो एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधारही ठरला आहे. त्याने 9 सामन्यांत 503 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने 2003 वर्ल्डकपमध्ये सौरव गांगुलीने केलेल्या 465 धावांच्या आव्हानाला मागे टाकले आहे.

याशिवाय रोहित दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये 500 धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने 2019 साली देखील 500 धावांचा टप्पा पार केला होता. तसेच सलग दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये 500 धावा करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिनने 1996 आणि 2003 वर्ल्डकप स्पर्धांमध्ये 500 धावांचा टप्पा पार केला होता.

  • एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार -

    • 503 धावा - रोहित शर्मा (2023)

    • 465 धावा - सौरव गांगुली (2003)

    • 443 धावा - विराट कोहली (2019)

    • 332 धावा - मोहम्मद अझरुद्दीन (1992)

    • 303 धावा - कपिल देव (1983)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT