Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final BCCI
क्रीडा

World Cup 2023: पाचव्यांदा फिफ्टी हुकली, पण कर्णधार रोहित शर्माने रचला नवा इतिहास

Rohit Sharma Record: रोहित शर्माची वर्ल्डकप 2023 फायनलमध्ये अर्धशतक थोडक्यात हुकले, मात्र त्याने एक नवीन विश्वविक्रम केला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia, Final, Rohit Sharma Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

भारताकडून शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र गिलला पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने ४ धावांवरच माघारी पाठवले. असे असले तरी रोहितने मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता.

त्यामुळे तो मोठी खेळी करेल, असे वाटत होते, पण रोहितला ग्लेन मॅक्सवेलने मोठा फटका खेळण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे रोहितने हवेत फटका मारला, पण ट्रेविस हेड कव्हर पाँइंटपासून पळत गेला आणि त्याने शानदार झेल घेतला. त्यामुळे रोहितला माघारी परतावे लागले.

रोहितने 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. दरम्यान, रोहितचे अर्धशतक थोडक्यात हुकण्याची ही या वर्ल्डकपमधील पहिली वेळ नाही. यापूर्वीही चार सामन्यात तो 40 धावा केल्यानंतर बाद झाला आहे.

परंतु असे असले तरी त्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळताना खास विक्रम केले आहेत. रोहितने वनडे वर्ल्डकपमध्ये 11 सामन्यांत 54.27 च्या सरासरीने 597 धावा केल्या आहेत. त्याने 31 षटकार मारले आहेत.

त्यामुळे रोहित एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम केन विलियम्सनच्या नावावर होता. त्याने 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या. तसेच रोहित एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाराही खेळाडू आहे.

एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार -

  • 597 धावा - रोहित शर्मा (2023 वर्ल्डकप)

  • 578 धावा - केन विलियम्सन (2019 वर्ल्डकप)

  • 548 धावा - माहेला जयलर्धने (2007 वर्ल्डकप)

  • 539 धावा - रिकी पाँटिंग (2003 वर्ल्डकप)

  • 507 धावा - ऍरॉन फिंच (2019 वर्ल्डकप)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT