Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 3rd ODI: रोहित शर्माचा राजकोटमध्ये जलवा, षटकारांचा वर्षाव करत केले 5 रेकॉर्ड; ख्रिस गेलही मागे

Manish Jadhav

IND vs AUS, 3rd ODI: 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगळ्याच मूडमध्ये दिसला.

राजकोटच्या मैदानावर 353 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, रोहितचे शतक हुकले.

त्याने 57 चेंडूंचा सामना केल्यानंतर 81 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार मारले. रोहितने षटकार ठोकून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. आम्ही तुम्हाला रोहितने केलेल्या पाच आश्चर्यकारक विक्रमांबद्दल सांगत आहोत.

दरम्यान, रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 550 षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ख्रिस गेलचा (Chris Gayle) विक्रम मोडला.

रोहितने 471 डावात हा आकडा गाठला होता तर गिलने 544 डावात इतके षटकार ठोकले होते. मात्र, सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या (553) नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त तीन षटकारांची गरज आहे.

एका देशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा पराक्रम रोहितने केला आहे. त्याने या बाबतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा पराभव केला आहे. रोहितने भारतात 257 षटकार तर न्यूझीलंडमध्ये गुप्टिलने 256 षटकार मारले आहेत.

त्याच्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंडमध्ये 230), ख्रिस गेल (वेस्ट इंडिजमध्ये 228) आणि एमएस धोनी (भारतात 186) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय, 350, 400, 450, 500 आणि 550 षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

एका डावात सर्वाधिक 5 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा रोहित हा भारतीय फलंदाज आहे, त्याने असे 31 वेळा केले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत केवळ 10 वेळा हा पराक्रम केला आहे.

युवराज सिंग (Yuvraj Singh) (9 वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे. धोनी, सचिन तेंडुलकर, कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी 8-8 वेळा असे केले.

विशेष म्हणजे, 2002 पासून, वनडेमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित अव्वल आहे. त्याने आतापर्यंत 89 षटकार मारले आहेत. रोहितनंतर या यादीत सेहवाग (43), शिखर धवन (24), सचिन (12), शुभमन गिल (12), कोहली (11) आणि सौरव गांगुली (11) आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT