Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

ICC Mens Test Batting Rankings: रोहितचा जलवा, फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये मिळवले स्थान; यशस्वी जयस्वालही...

Manish Jadhav

ICC Mens Test Batting Rankings: वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

तो पुन्हा एकदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल-10 मध्ये परतण्यात यशस्वी झाला आहे, तर वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने आयसीसी क्रमवारीत प्रथमच स्थान मिळवले आहे. यशस्वीने पहिल्या कसोटी सामन्यात 171 धावांची दमदार खेळी खेळली.

दरम्यान, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल यांनी शानदार शतके झळकावल्यामुळे भारताने डोमिनिका येथे दोन सामन्यांच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेतील पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला.

रोहितने 103 धावांची खेळी खेळत तीन अंकांनी झेप घेतली आणि पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये स्थान मिळवले. ICC कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभ पंत 11 व्या आणि माजी कर्णधार विराट कोहली 14 व्या स्थानावर आहेत.

दुसरीकडे, युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने 387 चेंडूत 171 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यामुळे तो क्रमवारीत 73 व्या स्थानावर पोहोचला. जयस्वालला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT