Rohit Sharma with Family Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: पत्नी रितीकाचा फोन समुद्रात पडताच रोहित शर्मानं केलं असं काही की...

रोहित शर्मा पत्नी रितीका आणि मुलगी समायरासोबत फिरायला गेला आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Jumps in Water to Save Wife's Phone: भारतीय क्रिकेट संघाला 11 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता भारतीय संघाला जवळपास 1 महिन्यांची विश्रांती मिळाली आहे. या विश्रांतीच्या काळात भारतीय खेळाडू कुटुंबासमवेत वेळ घातवत आहे.

भारतीय संघ आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्याआधी भारतीय संघातील साधारण महिन्याभराची सुट्टी मिळाली आहे. या सुट्टांदरम्यान, काही खेळाडू कुटुंबासमवेत सहलीला गेले आहेत.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील पत्नी रितीका आणि मुलगी समायराबरोबर फिरायला गेला आहे. पण याचदरम्यान, त्यांच्याबरोबर एक घटना घडली, ज्याची माहिती रितीकाने इंस्टाग्राम स्टोरीमधून दिल आहे.

तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित वेगवेगळे हावभाव करत आहेत. या व्हिडिओवर तिने कारणही लिहिले आहे. तिने लिहिले की तिचा फोन समुद्रात पडला होता. पण तो वाचवण्यासाठी त्याने थेट पाण्यातच उडी टाकली. रोहितचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Rohit Sharma

भारताचा कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभव

इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताला २०९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हा भारताचा कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यातील सलग दुसरा पराभव होता. यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2019-21 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध 8 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताला करायचा आहे वेस्ट इंडिज दौरा

आता भारताला वेस्ट इंडिज दौरा करायचा असून या दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT