भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिका (One Day) 18 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. या मालिकेतील तीन सामन्यांसाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला ब्रेक देण्यात आला आहे. पण रोहितने (Rohit Sharma) नुकताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो म्हणजे भारताच्या परदेशी भूमीवर सर्वाधिक सामने जिंकण्याचा त्याचा एक भाग राहीला आहे.
रोहित भारताकडून परदेशात नोंदवलेल्या सर्वाधिक सामन्यांचा एक भाग राहीला आहे. त्याने या रेकॉर्डमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. भारताने परदेशी भूमीवर जिंकलेल्या 102 सामन्यांमध्ये रोहितचा सहभाग आहे. तर धोनी केवळ 101 सामन्यांचा भाग राहीला आहे. या बाबतीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 97 सामन्यांमध्ये उपस्थिती नोंदवली आहे. तर सचिन तेंडुलकर 89 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
रोहित (Rohit Sharma) हा टीम इंडियाचा (India) दिग्गज खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 233 एकदिवसीय सामने खेळले असून या कालावधीत त्याने 9376 धावा केल्या आहेत. रोहितने या फॉरमॅटमध्ये 29 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. त्याने 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3487 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 4 शतके आणि 27 अर्धशतके केली आहेत. रोहितने 45 कसोटी सामन्यात 3137 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटने 8 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.