Rohit Sharma hugs Wasim Akram video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: रोहित शर्माने नको तेच केलं! सूर्याने हात झटकला, तर पाकिस्तानी खेळाडूला 'हिटमॅन'ने मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma hugs Wasim Akram video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच तणावाचा आणि कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील युद्धासारखा असतो.

Sameer Amunekar

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच तणावाचा आणि कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील युद्धासारखा असतो. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी टी-२० विश्वचषकात झालेल्या भारत-पाक सामन्यात भारतीय संघाने मैदानावर 'नो हँडशेक' (हात न मिळवण्याची) परंपरा कायम राखली. मात्र, याच दरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर रोहित शर्मा याने पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अकरमची गळाभेट घेतल्याने सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नेमकी घटना काय?

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सामन्यापूर्वी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयसीसीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रोहित शर्मा या सामन्यासाठी उपस्थित होता. यावेळी मैदानावर रोहित आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांची भेट झाली. दोघांनीही एकमेकांचे हसून स्वागत केले, गळाभेट घेतली आणि एकत्र फोटोही काढले. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होताच क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

'नो हँडशेक' मुळे वादात भर

या भेटीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करण्याचे मुख्य कारण म्हणजे मैदानावरची परिस्थिती. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन केले नाही. सामना संपल्यानंतरही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवले नाहीत. एकीकडे मैदानावर भारतीय संघ कडक भूमिका घेत असताना, दुसरीकडे रोहितने पाकिस्तानी दिग्गजाची घेतलेली गळाभेट अनेक चाहत्यांना खटकली आहे. काहींनी याला खेळाडूवृत्ती म्हटले असले, तरी अनेकांनी रोहितवर टीका केली आहे.

भारताचा विजय

या वादाच्या पार्श्वभूमीवर मैदानावर मात्र भारताचीच सरशी पाहायला मिळाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माची विकेट लवकर गमावली, परंतु ईशान किशनच्या तुफानी ७७ धावांच्या जोरावर १७५ धावांचे लक्ष्य उभे केले. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजीसमोर पत्त्यांसारखा कोसळला. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ केवळ ११४ धावांत गारद झाला. भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकून विश्वचषकात आपला दबदबा कायम राखला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT