Rohit Sharma 5th T20 International Century Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: हिटमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड! अफगाणिस्तानविरुद्ध ठोकली विक्रमी सेन्चुरी; पुन्हा बनला शतकांचा बादशहा

Manish Jadhav

Rohit Sharma 5th T20 International Century: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना बंगळुरु येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने वेगवान सुरुवात केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 14 महिन्यांनंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र पहिल्या दोन T20 मध्ये त्याला खातेही उघडता आले नाही.

आता तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हिटमॅनने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि त्याचे पाचवे T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. या बाबतीत तो आता पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. अलीकडेच सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी त्याची बरोबरी साधली होती. पण आता पुन्हा एकदा हिटमॅन टी-20 इंटरनॅशनलमध्ये शतकांचा बादशहा बनला आहे.

T20I मध्ये सर्वाधिक शतके

रोहित शर्मा- 5

सूर्यकुमार यादव-4

ग्लेन मॅक्सवेल-4

बाबर आझम-3

कॉलिन मुनरो- 3

एकट्याने टीम इंडियाला सावरले

दरम्यान या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकट्याने डाव सांभाळला. त्याने 64 चेंडूत शतक पूर्ण करत उत्कृष्ट खेळी खेळली. तो आता पुन्हा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. याशिवाय, रोहितच्या नावावर कसोटीत 10 आणि वनडेमध्ये 31 शतके आहेत. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 46 वे शतक ठरले.

सामन्यात टीम इंडियाची धावसंख्या 22 धावांवर चार विकेट्स असताना रोहितने एकहाती डाव सावरुन भारताला मजबूत स्थितीत आणले. या सामन्यात फरीद अहमदला संधी मिळाली आणि त्याने यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, संजू सॅमसन यांना बाद केले. अजमतुल्ला उमरझाईने शिवम दुबेची विकेट घेतली. विराटप्रमाणेच संजू सॅमसनही गोल्डन डकवर आऊट झाला.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारताने कोणत्याही विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी

190* रोहित शर्मा- रिंकू सिंह विरुद्ध अफगाणिस्तान, बंगळुरु 2024

176 संजू सॅमसन-दीपक हुडा विरुद्ध आयर्लंड डब्लिन 2022

165 रोहित शर्मा-केएल राहुल विरुद्ध श्रीलंका, इंदूर 2017

165 यशस्वी जयस्वाल-शुभमन गिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉडरहिल 2023

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

126*शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड अहमदाबाद 2023

123* ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया गुवाहाटी 2023

122* विराट कोहली विरुद्ध अफगाणिस्तान दुबई 2022

121* रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान बंगळुरु 2024

विराट कोहलीला मागे टाकले

विराट कोहलीने 50 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यामध्ये त्याने 47.57 च्या सरासरीने 1,570 धावा केल्या. यात 13 अर्धशतकांचा समावेश होता. पण आता रोहित शर्माने विराटचा हा आकडा पार केला आहे. कर्णधार म्हणून T20I धावांच्या बाबतीत रोहित आता फक्त अॅरोन फिंच, बाबर आझम आणि केन विल्यमसनच्या मागे आहे.

अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय कर्णधार

रोहित, कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे फक्त तीन भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी कर्णधार म्हणून 1,000 पेक्षा जास्त T20 धावा केल्या आहेत. रोहित आणि कोहली या दोघांच्या नावावर 1,500 हून अधिक धावा आहेत, तर धोनीने कर्णधार म्हणून 1,112 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT