Rohit Sharma 
क्रीडा

Rohit Sharma: हिटमॅनच्या 18 हजार धावा पूर्ण; यापूर्वी 'या' 4 भारतीय क्रिकेटर्सने केलाय असाच कारनामा

India vs England: रोहित शर्माने वर्ल्डकप 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 18 हजार धावा पूर्ण केल्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, Rohit Sharma 18000 runs in International Cricket:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (29 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना झाला. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली.

रोहितने या सामन्यात 66 चेंडूत त्याचे वनडेतील 54 वे अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 18 हजार धावाही पूर्ण केल्या. त्याला 18 हजार धावांसाठी या सामन्यापूर्वी 47 धावांची गरज होती. त्यामुळे त्याने अर्धशतकाबरोबर 18 हजार धावांचा पल्लाही गाठला.

रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा करणारा जगातील 20 वा खेळाडू आहे, तर भारताचा केवळ पाचवा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या भारतीय खेळाडूंनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा केल्या आहेत.

दरम्यान, रोहित या चौघांपेक्षाही सर्वात जास्त डाव खेळून 18 हजार धावा करणारा खेळाडूही आहे. रोहितने 478 व्या डावात 18 हजार धावा केल्या आहेत. विराटने 382 डावात, सचिनने 412 डावात, द्रविडने 436 डावात आणि गांगुलीने 470 डावात 18 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या होत्या.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू -

    • 34357 - सचिन तेंडुलकर

    • 26121 - विराट कोहली

    • 24208 - राहुल द्रविड

    • 18575 - सौरव गांगुली

    • 18028 - रोहित शर्मा

रोहितची कर्णधार म्हणून सेंच्युरी

दरम्यान, रोहितसाठी हा भारताचा कर्णधार म्हणून 100 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यामुळे रोहित भारताचे 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणारा सातवा कर्णधार ठरला. भारताकडून सर्वाधिक 332 आंतरराष्ट्रीय सामन्यात एमएस धोनीने नेतृत्व केले आहे.

भारताचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत धोनी पाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन (221 सामने), विराट कोहली (213 सामने), सौरव गांगुली (195 सामने), कपिल देव (108 सामने) राहुल द्रविड (104 सामने) आणि रोहित शर्मा (100 सामने) यांचा क्रमांक लागतो.

रोहितने नेतृत्व केलेल्या 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9 कसोटी, 40 वनडे आणि 51 टी20 सामन्यांचा समावेश आहे.

रोहितने 100 व्या सामन्यापूर्वी नेतृत्व केलेल्या 99 सामन्यांपैकी 73 सामने जिंकले आहेत, 23 सामने पराभूत झाले आहेत. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT