Rohit Sharma Century AFP
क्रीडा

Rohit Sharma: राजकोटमध्ये रो'हिट'! शतक ठोकत रचले विक्रमांचे मनोरे, दिग्गजांच्या पंक्तीत सामील

India vs England, Rohit Sharma Century: रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत शतक ठोकत अनेक विक्रम मोडले आहेत.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test Match at Rajkot, Rohit Sharma Century Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. राजकोटमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. याबरोबर त्याने अनेक विक्रमही मोडीत काढले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताने 33 धावातच तीन विकेट्स गमावल्या. परंतु, त्यानंतर भारताचा डाव सलामीवीर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी दीडशतकी भागीदारी करत सावरला.

त्यांच्या भागिदारीदरम्यान पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात सुरुवातीलाच रोहितने त्याच्या शतकाला गवसणी घातली. त्याने 157 चेंडूत त्याचे 11 वे कसोटी शतक पूर्ण केले.

शतकानंतर रोहित 64 व्या षटकात बाद झाला. त्याने या 196 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 131 धावा केल्या आहेत.

दरम्यान, हे त्याचे कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील आठवे शतक आहे. त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत आठ शतके करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. त्याच्यापोठापाठ प्रत्येकी 4 शतकांसह विराट कोहली आणि मयंक अगरवाल आहे.

गेलची बरोबरी

रोहितचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सलामीला खेळताना केलेले 42 वे शतक ठरले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीरांमध्ये त्याने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

गेलनेही 42 शतके सलामीला खेळताना केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर 49 शतकांसह डेव्हिड वॉर्नर आहे, तर 45 शतकांसह सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर

  • 49 शतके - डेव्हिड वॉर्नर (454 डाव)

  • 45 शतके - सचिन तेंडुलकर (342 डाव)

  • 42 शतके - ख्रिस गेल (506 डाव)

  • 42 शतके - रोहित शर्मा (339 डाव)

  • 41 शतके - सनथ जयसूर्या (563 डाव)

सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार

रोहितने गुरुवारी शतक केले, तेव्हा त्याचे वय 36 वर्षे 291 दिवस इतके होते. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला. त्याने विजय हजारे यांच्या विक्रमाला मागे टाकले. त्यांनी 36 वर्षे 278 इतके वय असताना इंग्लंडविरुद्ध नेतृत्व करताना शतक केले होते.

धोनीलाही टाकले मागे

दरम्यान, रोहितने शतक करताना 3 षटकार मारले होते, त्यामुळे त्याने एमएस धोनीच्या कसोटीतील 78 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी षटकार मारण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने 90 षटकार मारले आहे. त्याच्या मागे आता 80 षटकारांसह रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

रोहितने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे, असा पराक्रम करणारा तो भारताचा नववा खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (3990), विराट कोहली (3970), एमएस धोनी (2999), राहुल द्रविड (2993), सुनील गावसकर (2919), मोहम्मद अझरुद्दीन (2189), युवराज सिंग (2154), दिलीप वेंगसरकर (2115) यांनी केला आहे.

गांगुलीला टाकले मागे

रोहितने हे शतक करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रोहितच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 494 डावात 18641 धावा झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय

  • 34357 धावा - सचिन तेंडुलकर (782 डाव)

  • 26733 धावा - विराट कोहली (580 डाव)

  • 24208 धावा - राहुल द्रविड (605 डाव)

  • 18641 धावा - रोहित शर्मा (494 डाव)

  • 18575 धावा - सौरव गांगुली (488 डाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT