Rohit Sharma X/ICC
क्रीडा

IND vs AFG: ...तर रोहित कॅप्टनकूल धोनीचा विक्रम मोडेलच, पण भारताचा सर्वात यशस्वी T20 कर्णधारही ठरणार

Rohit Sharma: अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात खेळण्यासाठी उतरताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या निशाण्यावर एमएस धोनीचा विक्रम असणार आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 3rd T20I Match at Bengaluru, Rohit Sharma:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी (17 जानेवारी) बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.

या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. आता जर बंगळुरूला होणारा तिसरा टी20 सामनाही भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकला, तर भारतीय संघ अफगाणिस्तानल व्हाईटवॉश तर देईल, पण त्याचबरोबर रोहित भारताचा टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल.

जर तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर हा रोहितचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 54 सामन्यातील 42 वा विजय असेल. त्यामुळे तो माजी कर्णधार एमएस धोनीच्या सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाला मागे टाकेल.

सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये एमएस धोनी आणि रोहित प्रत्येकी 41 विजयांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. तर जगातील एकूण कर्णधारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, रोहितने 42 विजय मिळवले, तर तो असघर अफगाण, बाबर आझम, ब्रायन मसाबा आणि ओएन मॉर्गन यांची बरोबरी करेल. या चौघांनी आंतराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून प्रत्येकी 42 विजय मिळवले आहेत.

आंतराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

  • 42 विजय - असघर अफगाण (52 सामने) (अफगाणिस्तान)

  • 42 विजय - बाबर आझम (71 सामने) (पाकिस्तान)

  • 42 विजय - ब्रायन मसाबा (54 सामने)(युगांडा)

  • 42 विजय - ओएन मॉर्गन (72 सामने) (इंग्लंड)

  • 41 विजय - एमएस धोनी (72 सामने) (भारत)

  • 41 विजय- रोहित शर्मा (53 सामने) (भारत)

  • 40 विजय - ऍरॉन फिंच (76 सामने) (ऑस्ट्रेलिया)

पहिली टी20 मालिका

दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान आत्तापर्यंत अनेकदा टी20 क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आमने-सामने आले आहेत. मात्र, ही पहिलीच वेळ आहे की भारत आणि अफगाणिस्तान द्विपक्षीय टी20 मालिकेत आमने-सामने आले आहेत.

भारत आणि अफगाणिस्तान वेगवेगळ्या स्पर्धेत आत्तापर्यंत 7 टी20 सामने खेळले आहेत. यातील 6 सामने भारताने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT