Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup Final 2023: रोहित शर्मा जाम खूष... म्हणाला, 'हा' आहे आमच्या संघाचा सर्वात मोठा मॅच विनर

Manish Jadhav

India vs Sri lanka Asia Cup 2023: भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला. टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेच्या टीमचा 10 विकेट्सने पराभव केला.

या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला अवघ्या 50 धावांत गुंडाळून 37 चेंडूत लक्ष्य गाठून 8व्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा 'हिरो' मोहम्मद सिराज ठरला.

त्याचवेळी, संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. टूर्नामेंट जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आणि खेळाडूंचं कौतुकही केलं.

कर्णधार रोहितने खेळाडूंचे कौतुक केले

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही खूप चांगली कामगिरी केली. फायनलमध्ये शानदार कामगिरी करणे ही मानसिक कणखरता दर्शवते. बॉलने चांगली सुरुवात केली आणि बॅटने शानदार फिनिशिंग केली.

मी स्लिपमध्ये उभा होतो आणि मला अभिमान आहे की आमचे वेगवान गोलंदाज खूप मेहनत घेत आहेत.

विशेष म्हणजे, त्यांना काय करायचं आहे ते खूप चांगलं माहित आहे. आज खूप आनंद झाला. अशी कामगिरी आम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील.'

रोहित पुढे म्हणाला की, 'आम्ही एवढं करु असं कधीच वाटलं नव्हतं. पंरतु आजच्या विजयातून खेळाडूंचे स्कील आणि इच्छाशक्ती दर्शवते. सिराजला खूप श्रेय दिले पाहिजे. सीमर्ससाठी चेंडू हवेत आणि खेळपट्टीबाहेर घेवून जाणे हे दुर्लभ आहे.

या स्पर्धेत आम्हाला संघ म्हणून जे काही करता येईल ते आम्ही केले. आता आमचे लक्ष भारतात होणाऱ्या मालिकेवर आणि त्यानंतर विश्वचषकावर आहे.

त्याचवेळी, दबावाच्या परिस्थितीतही हार्दिक आणि इशानने पाकिस्तानविरुद्ध ज्या प्रकारे फलंदाजी केली आणि त्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली यांनी शतके झळकावली हे कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर, गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'

टीम इंडियाने 8व्यांदा विजेतेपद पटकावले

अंतिम सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी शानदार झाली. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संपूर्ण संघ 15.2 षटकात केवळ 50 धावांवरच ऑलऑउट झाला.

टीम इंडियाने हे लक्ष्य 6.1 षटकांत कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने आपल्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात चेंडू शिल्लक ठेवत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT