Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, विराट-सचिनच्या या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

IND vs AUS 4th Test Match: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 4th Test Match: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसह तो एका खास यादीत सामील झाला आहे.

कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17,000 धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय फलंदाज बनून रोहित शर्माने इतिहास रचला आहे.

आपला 438 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या 35 वर्षीय रोहित शर्माला (Rohit Sharma) 17 हजार धावा पूर्ण करण्यासाठी या सामन्यापूर्वी 21 धावांची गरज होती.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो 17 धावांवर नाबाद राहिला आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात आणखी चार धावा करुन एलिट क्लबमध्ये सामील झाला.

या फलंदाजांनी 17000 धावा केल्या आहेत

रोहित शर्मापूर्वी, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी विकेटकीपर-फलंदाज एमएस धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

भारतात सर्वात जलद 2000 कसोटी धावा

रोहित शर्मा भारतात सर्वात जलद 2000 कसोटी धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 36 डावात 2000 कसोटी धावांचा टप्पा पार केला. मात्र या डावात मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला.

टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र 58 चेंडूत 35 धावा केल्यावर त्याने आपली विकेट गमावली. या खेळीत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'22 मिनिटांचा तो थरार' विसरु नका, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकड्यांना थेट इशारा; 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेलं नाही!

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

SCROLL FOR NEXT