Rohit Sharma BCCI
क्रीडा

Rohit Sharma: 'T20 वर्ल्डकपमध्ये खेळवणार की नाही, आत्ताच सांगा...', रोहितचा BCCI ला सवाल

Rohit Sharma: बीसीसीआयची काही दिवसांपूर्वीच एक बैठक झाली, ज्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता.

Pranali Kodre

Rohit Sharma asked BCCI if they wanted him to be part of T20 World Cup 2024 says Report:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) नुकतीच काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीसाठी निवड समीती, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होते.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार या बैठकीत भारतीय संघाच्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील मोहिमेबद्दल चर्चा करण्यात आली. या स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता राहिला होता.

याशिवाय भारतीय संघाच्या पुढील वाटचालीबद्दलही चर्चा झाली. यामध्ये सहा महिन्यांनी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेबद्दलही चर्चा करण्यात आली. याच बैठकीदरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार रोहितने लंडनमधून झुम कॉलद्वारे या बैठकीसाठी उपस्थिती लावली होती. तसेच रिपोर्ट्सनुसार त्याने या बैठकीवेळी त्याने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना त्याचा टी20 वर्ल्डकप 2024 साठी विचार केला जाणार आहे की नाही, याबद्दल प्रश्नही विचारले.

नाव न सांगण्याच्या अटीवरून बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की रोहितने अजित अगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला विचारले 'तुम्ही मला टी20 वर्ल्डकपसाठी निवडणार असाल, तर मला त्याबद्दल आत्ताच सांगा.'

तसेच अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार द्रविड आणि निवड समितीने रोहितने टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करावे, यासाठीही सहमती दर्शवली.

निवड समितीची इच्छा होती की रोहितने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच टी20 संघाचे नेतृत्व करावे, मात्र त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेसाठी विश्रांती मिळावी म्हणून विनंती केली होती. त्यामुळे बीसीसीआयने ही विनंती मान्य केली आणि सूर्यकुमार यादवकडे टी20 साठी आणि केएल राहुलकडे वनडे संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली.

दरम्यान आता जर रोहित टी20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणार असेल, तर हार्दिक पंड्याचे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 2022 टी20 वर्ल्डकपनंतर भारताकडून टी20 क्रिकेट फारसे खेळलेले नाही. त्यांचे लक्ष वनडे वर्ल्डकपवर होते.

पण आता वनडे वर्ल्डकप संपला असल्याने त्यांना पुनरागमनाची संधी मिळण्याबद्दल चर्चा होत आहेत.

दरम्यान, रोहित टी20 खेळत नसताना बीसीसीआयने हार्दिक पंड्याकडे भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व सोपवले होते. पण बीसीसीआयने कधीही हार्दिकला भारताच्या टी20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून घोषित केले नव्हते. सध्या हार्दिक घोट्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT