Rohan Bopanna-Matthew Ebden X/SonySportsNetwk
क्रीडा

Australian Open 2024: बोपन्ना - एब्डेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक! जागतिक क्रमवारीतही गरुडझेप

Rohan Bopanna - Matthew Ebden: भारताचा 43 वर्षीय टेनिसपटू रोहन बोपन्नाने पार्टनर एब्डेनबरोबर खेळत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

Pranali Kodre

Rohan Bopanna-Matthew Ebden entered men’s doubles quarterfinal of Australian Open 2024

मेलबर्नमध्ये सध्या ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा 43 वर्षीय टेनिसपटू रोहन बोपन्ना त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेनबरोबर पुरुष दुहेरीत खेळत आहे. दरम्यान, सोमवारी (22 जानेवारी) बोपन्ना आणि एब्डेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

दुसऱ्या मानांकित बोपन्ना आणि एब्डेन या जोडीने सोमवारी तिसऱ्या फेरीत 14 व्या मानांकित डच-क्रोएशियन जोडी वेस्ली कूलहॉफ आणि निकोला मेक्टिक या जोडीला 7-6 (10-8), 7-6 (7-4) अशा दोन सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.

या विजयासह बोपन्ना आणि एब्डेन यांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे. आता त्यांचा उपांत्यपूर्व सामना अर्जेटिनाची जोडी मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्याविरुद्ध मंगळवारी (23 जानेवारी) होणार आहे.

दरम्यान, तिसऱ्या फेरीतील विजयानंतर बोपन्नाचे जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये दुसरे स्थान पक्के झाले आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. जर त्याने एब्डेनसह उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला, तर तो अव्वल स्थानावर पोहचेल.

बोपन्ना-एब्डेनचा विजय

सोमवारी पावणे दोन तास चालेल्या सामन्यात बोपन्ना आणि एब्डेन या दोघांनाही कूलहॉफ आणि मेक्टिक यांच्या जोडीने तोडीस तोड आव्हान दिले होते. दोन्ही सेट बोपन्ना आणि एब्डेन यांना टायब्रेकरमध्ये जिंकावे लागले.

पहिल्या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झाल्यानंतर बोपन्ना आणि एब्डेन यांना टायब्रेकर जिंकण्यासाठी 10 पाँइंट्स जिंकावे लागेल. यानंतरही दुसऱ्या सेटमध्येही 6-6 अशी बरोबरी झाल्याने हा सेटही टायब्रेकरमध्ये गेला होता. या सेटमध्ये बोपन्नाचा खेळ चांगला झाला. त्यामुळे सुरुवातीलाच बोपन्ना-एब्डेन जोडीने घेतलेली आघाडी कायम ठेवत सामना जिंकला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्यावर्षी बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. पण अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT