Rohan Bopanna X
क्रीडा

Australian Open: बोपन्नाची एब्डेनसह फायनलमध्ये धडक! दोन तासाच्या लढाईनंतर जिंकली थरारक सेमीफायनल

Rohan Bopanna - Matthew Ebden: भारताच्या रोहन बोपन्नाने मॅथ्यू एब्डेनसह खेळताना ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

Rohan Bopanna-Matthew Ebden entered men’s doubles Final of Australian Open 2024:

मेलबर्नमध्ये सध्या ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेनसह सहभागी झाला आहे. बोपन्ना आणि एब्डेन या जोडीने गुरुवारी (25 जानेवारी) अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

गुरुवारी बोपन्ना आणि एब्डेन जोडीचा सामना झँग झिझेन आणि थॉमस मॅचॅक या जोडीविरुद्ध झाला. 2 तास 2 मिनिटे चाललेल्या या सामन्यात बोपन्ना-एब्डेन जोडीने 6-3,3-6,7-6 (10-7) अशा फरकाने झँग-मॅचॅक जोडीला पराभूत केले.

शेवटपर्यंत झँग-मॅचॅक जोडीने दुसऱ्या मानांकीत बोपन्ना-एब्डेन जोडीला तगडी लढत दिली होती. त्यांनी तिसऱ्या सेटमध्ये बोपन्ना-एब्डेनने मिळवलेले तीन मॅच पाँइंट्सही वाचवत बोपन्ना-एब्डेनला विजयासाठी आणखी प्रतिक्षा करायला लावली. मात्र अखेर बोपन्ना आणि एब्डेनने उपांत्य फेरी जिंकत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला.

बोपन्नाचा विक्रम

43 वर्षीय बोपन्नाने उपांत्यपूर्व फेरीतील विजयासह जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीमध्ये अव्वल क्रमांक पक्का केला आहे. आता त्याने हा क्रमांक आणखी भक्कम केला आहे.

बोपन्ना आणि एब्डेनने सलग दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्याचवर्षी वर्षातील चौथ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत म्हणजे अमेरिकन ओपनचाही अंतिम सामना खेळला होता. मात्र त्या अंतिम सामन्यात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

दरम्यान, बोपन्ना तब्बल 17 व्या प्रयत्नांनंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्याने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मध्ये सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत अंतिम सामना खेळला होता. पण त्या अंतिम सामन्यातही बोपन्ना आणि सानियाला पराभव स्विकारावा लागला होता.

आता बोपन्ना ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. जर त्याने एब्डेनसह ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला, तर तो ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडूही ठरेल.

बोपन्ना-एब्डेनचा उपांत्य फेरीत विजय

बोपन्ना आणि एब्डेन या जोडीने उपांत्य फेरीतील पहिला सेट सहज जिंकला होता. त्यांनी सुरुवातीलाच झँग-मॅचॅक जोडीला दबावात टाकले होते. मात्र पहिल्या सेट गमावल्यानंतर झँग-मॅचॅक जोडीने शानदार पुनरागमन केले आणि बोपन्ना-एब्डेनला तगडे आव्हान दिले.

त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये बोपन्ना-एब्डेनला वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दुसरा सेट झँग-मॅचॅक यांनी जिंकला आणि सामन्यात बरोबरी केली. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये बोपन्ना-एब्डेनने आघाडी घेतली होती. ते 4-5 ने आघाडीवर असताना त्यांना 3 मॅच पाँइंट्सही मिळाले होते. परंतु, झँग-मॅचॅक यांनी सर्व्ह राखली आणि 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही जोडींनी आपापल्या सर्व्ह राखण्यात यश मिळवल्याने 6-6 अशी बरोबरी झाल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागला.

टायब्रेकरमध्ये बोपन्ना-एब्डेनने मिळवलेली आघाडी कायम राखण्यात यश मिळवले आणि सामना जिंकत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. आता शनिवारी (२७ जानेवारी) बोपन्ना आणि एब्डेन हे अंतिम सामना खेळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

Goa Assembly Live: माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असल्याचा अभिमान

Digvesh Rathi: आयपीएलमधील वादानंतर दिग्वेश राठीची पुन्हा तीच चूक, DPL मध्ये फलंदाजासोबत बाचाबाची; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT