विम्बल्डन स्पर्धेत टेनिसचा मास्टर रॉजर फेडररने विक्रमाला गवसणी घालत 18 व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

रॉजर फेडररने विम्बल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत रचला विक्रम

2 तास 11 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सहाव्या मानांकित फेडररने लोरेन्झो सोनेगोचा सहज पराभव करीत 18 व्यांदा उपांत्यफेरीत प्रवेश करत इतिहास घडविला आहे.

दैनिक गोमन्तक

लंडन: विम्बल्डन स्पर्धेत (Wimbledon) टेनिसचा (Tennis) मास्टर रॉजर फेडररने (Roger Federer) विक्रमाला (Record) गवसणी घालत 18 व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फेडररने फ्रेन्चओपनमधून माघार घेतली होती. आठरावेळा विम्बल्डन विजेता राहिलेला रॉजर फेडररने 2021 च्या पुरुष एकेरीत इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा (Lorenzo Sonego of Italy) 7-5,6-4,6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत 58 व्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.

2 तास 11 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सहाव्या मानांकित फेडररने लोरेन्झो सोनेगोचा सहज पराभव करीत 18 व्यांदा उपांत्यफेरीत प्रवेश करत इतिहास घडविला आहे. या आधी जीमी कॉनर्स यांनी 14 वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तसेच विम्बल्डनमध्ये फेडरर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडररचे वय 39 वर्षे 337 दिवस इतके होते. यापूर्वी केन रोसवॉलच्या नावावर हा विक्रम होता त्यावेळी त्यांचे वय ३९ वर्षे २२४ दिवस इतके होते.

आज होणाऱ्या डॅनिल मेदवेदेव विरुध्द हबर्ट यांच्यातील विजेता उपांत्यपूर्व फेरीत फेडररसोबत खेळेल. काल पावसामुळे यांचा सामना रद्द करण्यात आला होता. मेदवेदेव आणि हबर्ट दोघांनीही या आधी विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेला नाही.

सोनेगेला फेडररने कोर्टवर धावण्यास भाग पाडले. पहिल्या सेटमध्ये सोनेगोने फेडररला झुंजावले. पहिला गेम 5-5 असा बरोरबरीत झाला, त्यानंतर खेळात पावसाचा व्यत्यय आला. सामना पुन्हा सुरु झाल्यावर मात्र फेडररने लय पकडत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. पहिला सेट 7-5 ने जिंकल्यावर पुढील दोन्ही सेट फेडररने 6-4, 6-2 असे सहज जिंकत सामन्यात विजय मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Goa Crime: फेरीबोटीतील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; मुख्य संशयितासह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT