प्रशिक्षकपदासाठी द्रविडने नकार दिल्यास 'या' तीन दिग्गजांची नावे चर्चेत

या पराभावानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना या पदावरुन दूर केल्यास त्यांच्या जागी राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक पद देण्यात यावे.
द्रविड यांनी काही कारणास्तव ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला तर, या तीन दिग्गजांपैकी एक भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे.
द्रविड यांनी काही कारणास्तव ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला तर, या तीन दिग्गजांपैकी एक भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसीने (ICC) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ (Indian team) अंतिम किंवा सामन्यापर्यंत जाऊन तेथे संघाला पराभूत व्हावे लागले आहे. यात वर्ल्डकप २०१९, जागतिक वर्ल्ड कसोटीचा अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघ पराभूत झाला आहे. या पराभावानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना या पदावरुन दूर केल्यास त्यांच्या जागी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मुख्य प्रशिक्षक (Head coach) पद देण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

परंतु द्रविड यांनी काही कारणास्तव ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला तर, या तीन दिग्गजांपैकी (veteran) एक भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे.

द्रविड यांनी काही कारणास्तव ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला तर, या तीन दिग्गजांपैकी एक भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे.
Ranji Trophy स्पर्धेत गोव्याला ‘क’ गट अपेक्षित

माईक हेसन : यांनी न्यूझीलंडसंघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत देखील यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे माईक हेसन भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

टॉम मूडी : टॉम मूडी यांना प्रशिक्षण पदाचा चांगला अनुभव आहे. आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक पद चांगल्या पध्दतीने संभाळले आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांच्या जागी टॉम मूडी यांचे देखील नाव चर्चेत आहे.

विरेंद्र सेहवाग: भारताचा आक्रमक फलंदाज सलामीवीर हे देखील भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. सेहवाग यांनी आयपीएलमध्ये किंग पंजाब संघाच्या प्रशिक्षक पदावर काम केले आहे. २०१७ ला अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पद सोडल्यानंतर विरेंद्र सेहवागने अर्ज केला होता. परंतु तो या पदावर नियुक्त न झाल्याने नाराज झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com