Roger Federer Dainik Gomantak
क्रीडा

Roger Federer: 'विम्बल्डनच्या किंग'ला खेळत नसतानाही स्टँडिंग ओव्हेशन! पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

Video: विम्बल्डन 2023 दरम्यान रॉजर फेडररचे कोर्टमध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले.

Pranali Kodre

Roger Federer receiving standing ovation from crowd: टेनिस जगतातीत दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर आणि विम्बल्डन यांचं नातं अनोखं आहे. त्याच्यासाठी विम्बल्डनमधील प्रवास अविश्वसनीय राहिला. फेडररने जिंकलेल्या 20 ग्रँडस्लॅमपैकी ८ विम्बल्डनच्या विजेतेपदांचा समावेश आहे. दरम्यान, फेडररने गेल्यावर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली.

त्यामुळे विम्बल्डनने त्याच्यासाठी खास सोहळा आयोजित केला होता. सध्या विम्बल्डन २०२३ ही ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान, हा सोहळा रॉजर फेडररला साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. ज्यावेळी सेंटर कोर्टमध्ये फेडररचे आगमन झाले, तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहुन बराचवेळ टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी फेडररही त्यांच्या प्रेमाचा आदाराने स्विकार करताना दिसला. तो काहीसा भावूकही झाल्याचा दिसला.

फेडररचे प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटनने रॉयल बॉक्समध्ये स्वागत केले होते. त्यावेळी केट मिडलटन देखील टाळ्या वाजवताना दिसली. तसेच त्या बॉक्समध्ये फेडररची पत्नी मिरका देखील होती. तसेच फेडररचे आई-वडील देखील उपस्थित होते.

फेडररने या कार्यक्रमासाठी फिकट तपकिरी रंगाचा सुट परिधान केला होता. फेडरर जवळपास 2 दशके विम्बल्डनमध्ये खेळला आहे.

दरम्यान, फेडररने या सोहळ्यानंतर झालेल्या काही सामन्यांचा आनंदही घेतला. नेहमी कोर्टमध्ये असलेला फेडरर यावेळी प्रेक्षकांमध्ये दिसत असल्याने काही चाहत्यांनी भावूक प्रतिक्रियाही दिल्या.

फेडररने पाहिलेल्या सामन्यांपैकी अँडी मरेच्या पहिल्या फेरीतील सामन्याचाही समावेळ होता. मरे आणि फेडररही एकमेकांचे कोर्टवर कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. सामना मरेने जिंकल्यानंतर प्रेझेंटेशनवेळी तो म्हणाला, "रॉजरला इथे पाहून आनंद झाला."

तसेच त्याने लंडनला झालल्या ऑलिम्पिकचीही आठवण सांगितली. याशिवाय मरेने त्याला त्याचा खेळ आवडला का असेही विचारले, ज्यावर फेडररनेही मान हलवून होकार दिला.

फेडररच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास तो राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचनंतर पुरुष एकेरीच सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा दुसला खेळाडू आहे. नदाल आणि जोकोविच यांनी प्रत्येकी २३ ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे.

फेडररने त्याच्या 20 ग्रँडस्लॅम विजयांपैकी 8 विम्बल्डनची विजेतीपदे जिंकली आहेत, तसेच 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 1 फ्रेंच ओपन आणि 5 अमेरिकन ओपनची विजेतीपदे जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT