Ritwij Parab Dainik Gomantak
क्रीडा

रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ऋत्विजने जेतेपदावर केला शिक्कामोर्तब

नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत अपराजित राहत त्याने सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: केपे तालुका बुद्धिबळ संघटनेने (Chess Association) घेतलेल्या चौथ्या चंद्रकांत नाईक स्मृती अखिल गोवा (Goa) खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ऋत्विज परब (Ritwij Parab) याने विजेतेपद मिळविले. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत अपराजित राहत त्याने सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली. विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना ऋत्विजने अखेरच्या फेरीत अनिरुद्ध पार्सेकर याला नमविले. शेवटच्या फेरीत मंदार लाड (Mandar Lad) याने नीरज सारिपल्ली याला हरवून उपविजेतेपद पटकाविले. नीरजला तिसरा क्रमांक मिळाला. पार्थ साळवी याला चौथा, तर जॉय काकोडकर याला पाचवा क्रमांक मिळाला. स्पर्धा केपे सरकारी महाविद्यालय संकुलात झाली.

रुबेन कुलासो, एथन वाझ, तन्वी हडकोणकर, आर्यन रायकर, साईराज वेर्णेकर, अनिरुद्ध पार्सेकर, दत्ता कांबळी, गुंजल चोपडेकर, व्हिवान बाळ्ळीकर, तनाद बांदोडकर यांना सहा ते पंधरावा क्रमांक मिळाला. केपे तालुका गटात अथर्व सावंत देसाई, निवेश नाईक यांना, 15 वर्षांखालील गटात अथर्व काटकर, अंकित शेट्टी, सान्वी नाईक गावकर, 13 वर्षांखालील गटात मयुरेश देसाई, एड्रिक वाझ, अस्मिता रे, आर्या दाभोळकर, 11 वर्षांखालील गटात अर्थ कारापूरकर, वेदांत आंगले, श्रीया पाटील, जेनिसा सिक्वेरा, 9 वर्षांखालील गटात राजवीर पाटील, ॲरोन डिसोझा, दिया सावळ, लाईया सिल्वेरा, 7 वर्षांखालील गटात रिशित गावस, श्रेष्ठ घोणसेकर, म्युरियल फर्नांडिस, द्विती फळदेसाई यांना बक्षीस मिळाले.

बक्षीस वितरण समारंभास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, मडगावच्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर, संयुक्त सचिव समीर नाईक, केपे तालुका बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र नाईक, स्पर्धा संचालक संजय कवळेकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर स्वप्नील होबळे, गौतम तारी, संदीप नाईक, दिगंबर सावळ, अमृत नाईक, वसंत नाईक, व्ही. बाळकृष्णन, समीर नाईक यांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT